मुल येथील खुनाचे गुन्हयातील मुख्य आरोपी व त्याचे साथीदार २४ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे ताब्यात

40

मुल येथील खुनाचे गुन्हयातील मुख्य आरोपी व त्याचे साथीदार २४ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे ताब्यात


  1. मुल :
    पोलीस स्टेशन मुल गु.र.नं- ५१२/२०२४ कलम १०३(१), ३ (५) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये दाखल खुनाचे गुन्हयातील आरोपीचा शोध स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांचे विविध पथके तयार करून दि.२७/१२/२०२४ रोजी गुन्हा घडलेपासुन अथक प्रयत्नाने सातत्याने आरोपीताचा शोध चंद्रपूर व लगतच्या जिल्हयात घेत असतांना नमुद गुन्हयातील मुख्य आरोपी नामे राहुल सत्तन पासवान, वय २० वर्षे, जात परधान (एस.टी), शिक्षण १२ वी, रा. बालविकास प्राथमिक शाळेजवळ, वॉर्ड नं.१५, मुल, ता.मुल.जि. चंद्रपूर, त्याचा साथीदार आरोपी अजय दिलीप गोटेफोडे, वय २२ वर्षे, रा. बालविकास प्राथमिक शाळेजवळ, वॉर्ड नं.१५, मुल, ता.मुल.जि. चंद्रपूर व विधीसंघर्षित बालक यास दि.२८/१२/२०२४ रोजी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीतुन ताब्यात घेण्यात आले असुन पुढील तपास श्री. दिनकर ठोसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मुल विभाग यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन मुल करीत आहेत.

सदरची कारवाई मा.श्री. सुदर्शन मुम्मका पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्रीमती रिना जनबंधु अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here