माकपचे तालुका अधिवेशन संपन्न तालुका सचिव पदी रामभाऊ जिडेवार यांची निवड

30

माकपचे तालुका अधिवेशन संपन्न
तालुका सचिव पदी रामभाऊ जिडेवार यांची निवड
________________________
मारेगाव : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा नियमानुसार दर तीन वर्षांनी शाखेपासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत अधिवेशन घेतले जातात. या अधिवेशनात दर तीन वर्षात नवीन कमिटीची निवड केल्या जाते. त्या अनुषंगाने मारेगाव तालुक्याची नवीन कमिटी निवडण्याकरता मारेगाव येथे तालुका अधिवेशन घेण्यात आले. या अधिवेशनाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी उपस्थित होते. या अधिवेशनात तालुका सचिव म्हणून एक मताने कॉ. रामभाऊ जिडेवार यांची पुनश्च तीन वर्षांकरिता निवड करण्यात आली.

अधिवेशनाचा सुरुवातीला सर्वप्रथम लाल झेंड्याला सलामी देऊन शहीद झालेल्या व निधन झालेल्या कॉम्रेडसना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर अधिवेशन सुरळीतपणे पार पाडण्याकरिता तीन सदस्यीय अध्यक्ष मंडळ निवडण्यात आले. त्यानंतर मारेगाव तालुका सचिव रामभाऊ जिडेवार यांनी मागील तीन वर्षाचा राजकीय, संघटनात्मक अहवालाचे वाचन केले. या अहवालावर पुंडलिक ढुमने, बंडू मत्कुलवार, धनंजय भोयर, श्रीकांत तांबेकर यांनी आपले मत व्यक्त केले.

या अधिवेशनात पुढील तीन वर्षांकरिता रामभाऊ जिडेवार, पुंडलिक ढुमने, धनंजय भोयर, बंडू मतकुलवार, विनायक जगताप, वासुदेव कनाके, श्रीकांत तांबेकर, सुरेश भोयर, खुशालराव सोयाम, सुधाकर सोनटक्के, किसन मोहुरले यांची तालुका कमिटी सदस्यपदी एकमताने निवड करण्यात आली. या तालुका कमिटी मधून तालुका सचिव म्हणून कॉ. रामभाऊ जिडेवार तर सहसचिव म्हणून पुंडलिक ढुमने व धनंजय भोयर यांची तर कोषाध्यक्ष म्हणून श्रीकांत तांबेकर यांची निवड करण्यात आली.

या अधिवेशनाला तालुक्यातील अनेक गावातील प्रमुख निवडक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here