चंद्रपुरात रस्ता सुरक्षा सप्ताह व पोलीस स्थापना दिन निमित्त रॅलीचे आयोजन

39

चंद्रपुरात रस्ता सुरक्षा सप्ताह व पोलीस स्थापना दिन निमित्त रॅलीचे आयोजन


 चंद्रपुर : रस्ता सुरक्षा सप्ताह निमीत्य चंद्रपुर जिल्हयात दि. ०१/०१/२०२५ पासुन वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहे. मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन चंद्रपुर व श्री. किरण मोरे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपुर व उपप्रादेशीक परिवहन कार्यालय, चंद्रपुर यांच्या संयुक्त विद्यमाने वाहतुक नियंमांचे महत्व व मोटार वाहन कायद्याविषयी नागरीकांमध्ये जनजागृती व्हावी याकरीता दिनांक ०३/०१/२०२५ रोजी शालेय विद्यार्थी व पोलीस कर्मचारी यांची वाहतुक नियमनाविषयी जनजागृत्ती रॅली आयोजीत करण्यात आली.
सदर रॅलीला मा. परिविक्षाधिन पोलीस अधिक्षक श्री. अंकित हिरडे, मा. प्रो. DYSP श्री. प्रमोद चौगुले यांनी हिरवी झेंडी दाखवुन रॅलीची सुरूवात केली.

ज्नजागृती रॅली ही वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपुर ते प्रियदर्शिनी चौक परत वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपुर पर्यंत काढण्यात आली. सदर जनजागृत्ती रॅली मध्ये सरदार पटेल महाविद्यालय, व इतर शाळेचे विद्यार्थी संबंधित शाळेचे शिक्षक तसेच श्री. प्रविणकुमार पाटील, पोलीस निरिक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा, चंद्रपुर, मोटार परीवहन निरिक्षक श्री. विशाल कसंबे, सहायक मोटार वाहन निरिक्षक श्री. अमानुल अन्सारी, सहायक मोटार वाहन निरिक्षक श्री. अंशुल मुर्दिव, सहायक मोटार वाहन निरिक्षक श्री. सुरज मुन व वाहतुक पोलीस अंमलदार हे सहभागी झाले होते.

तरी या जनजागृत्ती निमित्ताने वाहतुक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच सायबर क्राईमला बळी पडु नये असे आवाहन मा. श्री. पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here