चंद्रपूरात गुपचूपपणे स्मार्ट मीटर बसविण्याचे षडयंत्र?

5

चंद्रपूरात गुपचूपपणे स्मार्ट मीटर बसविण्याचे षडयंत्र?



चंद्रपूरात स्मार्ट मीटर लावण्यात येऊ नये
काँग्रेस तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून मागणी


घुग्घूस : महाराष्ट्रातील महावितरणच्या 2.61 कोटी ग्राहकाकडे स्मार्ट मीटर लावण्याची शासनाची योजना 2024 ला तैयार करण्यात आली होती.
पहिल्या टप्प्यात हे मीटर शासकीय कार्यलय तसेच शासकीय वसाहती मध्ये लावण्यात येणार होते.
राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस राज्याचे तत्कालीन उप – मुख्यमंत्री व वर्तमान मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रात स्मार्ट मीटर योजना लागू करण्यात येणार नाही असे जाहीर केले
मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस येथील ग्राहक महावितरण कार्यालयात ना दुरुस्त मीटर बदलविन्या संदर्भात गेले असता त्यांना सांगण्यात आले की आता हे साधे मीटर बंद झाले असून लवकरच नवीन स्मार्ट मीटर येणार आहे.
तेच मीटर आपल्याला लावून मिळतील
यामुळे महाराष्ट्रात निवडणुका पार पडल्या नंतर व नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर परत एकदा महाराष्ट्राच्या नागरिकांच्या मानगूटीवर गुपचूपपणे हे स्मार्ट मीटर बसविण्याचे प्रयत्न होत असल्याचे निरदर्शनास येताच काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी व पदाधिकाऱ्यांनी दिनांक 09 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन
चंद्रपूर जिल्ह्यात स्मार्ट मीटर लावण्यात येऊ नये अशी मागणी केली.
चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा असून येथे ठेकेदारी मजूर, शेत मजूर व छोटे व्यापारी यांची संख्या खूप मोठी असून ठेकेदारी कर्मचाऱ्यांना दोन – दोन महिने पगार मिळत नाही.
सध्या नागरिक दोन महिन्याचे बिल अतिरिक्त करा सहित भरतात मोबाईल रिचार्जे प्रमाणे विज बिल भरणे हे सर्वसामान्य नागरिकांना खूपच त्रासदायक ठरणार आहे.
विज ही मानवी जीवनातील मूलभूत गरज असल्याने शासनाने नागरिकांना अंधारात ठेवण्याचा षडयंत्र करू नये.
व मुख्यमंत्र्यांना दिलेला शब्द पाळावा अशी मागणी काँग्रेसने निवेदनातून केलेली आहे
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, रोहित डाकूर, सुनील पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here