घुग्घुस येथे जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांनातर्फे ग्रामीण रुग्णालयात भव्य रक्तदान शिबीर संपन्न
एकुण ४७ रक्तदात्यानी रक्तदान केले.
घुग्घूस : रक्तदान हे जगातले सर्वात श्रेष्ठदान आहे जात पात धर्म गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव न पाळता रक्तदान करता येतो गरिबातील गरीब व्यक्ती ज्यांच्या जवळ कुठलीच धन दौलत नाही तो व्यक्ती ही रक्तदान करून इतर व्यक्तीचा जीव वाचवू शकतो अनंत श्री विभुषीत जगदगुरु रामानंदचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या पावन स्मुर्ती अंतर्गत जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या वतीने दिनांक 12 जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालय घुग्घूस येथे सकाळी 8 :30 ते दुपारी 04 वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
सदर रक्तदान शिबिरात घुग्घुस शहरातील जवळपास 47 रक्तदात्यांनी रक्तदान केले सदर सामाजिक कार्यात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी पदाधिकाऱ्यांन सह उपस्थित होऊन कार्यकर्त्यांना रक्तदानास प्रेरित केले. कार्यक्रमाचे आयोजन दिलीप करकाडे यांच्या देखरेखित पार पडला