नायगांव सावंगी जुनी येथे तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न
घुग्घुस : जि.प. उच्च प्राथमिक शाळा, सावंगी (जुनी),खेळ व क्रीडा संवर्धन मडळ पंचायत समिती वणीच्या विद्यमाने सन २०२४-२५ चा तालुकास्तरीय क्रीडा महोत्सव दिनांक १० ते १३ जानेवारी या कालावधीत भूमिपुत्र क्रीडानगरी सावंगी जुनी येथे संपन्न झाला. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावंगी (जुनी) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या महोत्सवाचे मोठ्या थाटान उद्द्घाटन पार पडले.
वणी – विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार श्री संजय देरकर यांचे हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश किडे होते. शिरपूरचे ठाणेदार श्री माधव शिदि, माजी जि प सदस्य श्री विजय पिदुरकर, माजी जि प सदस्य सौ उमाताई पिदूरकर, सावंगीच्या सरपंच शालुताई ठाकरे आदी प्रमुख पाहूणे उपस्थित होते. याशिवाय सावंगी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तथा परिसरातील ग्रामपंचायतींचे सरपंच उपस्थित होते.
पंचायत समिती वणीचे गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांच्या मार्गदर्शनात या चार दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले सोबत वणीचे गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर यानी जातीने लक्ष भातले विस्तार अधिकारीद्वय प्रकाश नगराळे, निलेश हेडाऊ यांनी आयोजनात कुठेही कसर राहू दिली नाही. विनोद नासरे यांच्यासह तालुका साधन केंद्राची सर्व चमू यशस्वीतेकरीता उपस्थित होती.
क्रीडा महोत्सवात वणी पंचायत समितीमधील १३ केंद्र सहभागी झाले होते. यात १४३० खेळाडूंनी कबड्डी, खो-खो, लंगडी यासारख्या सांघिक खेळातून आपली चमक दाखवली उद्घाटन सोहळ्यातील नृत्य कवायत, शो ड्रिल्समधून ३९० विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या सामाजिक आशयांना धरून उत्तम सादरीकरण केले, तर वैयक्तिक खेळात ११ खेळ प्रकारातून ५७६ विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवले.
या क्रीडा महोत्सवासोचतच दोन दिवसीय तालुकास्तरीय कब बुलबुल मेळाव्याचेही आयोजन याच ठिकाणी पार पडले यात तालुक्यातून २८८ विद्यार्थी सहभागी झाले. २७ षटकांनी प्रत्यक्ष उपक्रमात सहभाग घेतला. शेकोटी, खरी कमाई, दोरी उड्या, तोल सांभाळणे, दोरी गाठी, वेळ ओळखणे, गणवेश, कबुलबुल अभ्यासक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम या उपक्रमातून त्यांनी आपली कौशल्ये सादर केली उत्तम कब आणि बुलबुलना समारोपीय कार्यक्रमात वेगवेगळ्या उपक्रमासाठी पारितोषिके देण्यात आली. याकरिता तालुका कय मास्टर रमेश बोबडे आणि तालुका फ्लॉक लीडर छबू मेश्राम यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत सूत्रे हाताळली.
क्रीडा महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम, बक्षीस वितरण समारंभ १३ जानेवारीला संपन्न झाला. सोहळवाच्या अध्यक्षस्थानी वेकोली, वणी एरियाचे महाप्रबंधक आभासचंद्र सिंग उपस्थित होने सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब दुधवत यांच्या हस्ते पारितोषिके बक्षीसे वित्तरित करण्यात आली. बक्षीस वितरण सोहळ्याला माजी जि प सदस्य विजय पिदूरकर, माजी जि प सदस्या उमाताई पिदूरकर, सामाजिक कार्यकर्ते दिनकर पावडे, एसबीआयचे शाखा व्यवस्थापक मनोज तांबे, पत्रकार विनोद ताजने आणि परिसरातील इतर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
स्थानिक ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी याच्या हस्तेही बक्षिसे वितरित करण्यात आली. क्रीडा महोत्सवाच्या यशस्वीतेत सर्वच सहभागी घटकांना यावेळी गौरवान्वीत करण्यात आले.
सांघिक तथा वैयक्तिक खेळातील विजेत्या, उपविजेत्या संघांना प्रमाणपत्रासह पारितोषिके देण्यात आली. शो ड्रिल्सचे पारदर्शी परीक्षण करून त्यांनाही पारितोषिक देण्यात आले, यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगावची चमू अव्वल ठरली. तर सर्वाधिक सामन्यातून आपल्या उत्तम प्रदर्शनाची चुणुक दाखवत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कायरने या सामन्यांचे अजिंक्यपद पटकावले.
उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार यांनी तर आभार प्रदर्शन गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर यांनी केले होते चारही दिवस चालणाऱ्या क्रीडासत्रात गजानन मत्ते, हंसराज काटकर यानी निवेदकाची भूमिका पार पाडत गतीने सामने पार पाडले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता माजी जि प सदस्य विजय पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात संतोष साबरे यांनी विशेष कार्य केले.
समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी स्नेहदीप काटकर यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावंगीचे मुख्याध्यापक प्रमोद भगत यांनी केले सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल शिरपूरकर यांनी केले होते.