40

घुग्गुस व चंद्रपूर येथील घरफोड्या करणारा आरोपीवर स्थानिक गुन्हे शाखा पोलीसची कार्रवाई



आरोपीकडुन एकुण सोने चांदीचे दागिने ३,६७,६९०/- रू माल जप्त


चंद्रपुर:
दिनांक १७/०१/२०२५ रोजी पोलीस स्टेशन घुग्गुस ता.जि. चंद्रपूर गु.र.नं ३६८/२०२४ कलम ३०५ (अ), ३३१ (४) भारतीय न्याय संहिता मधील आरोपीचे संदर्भाने प्राप्त गोपनीय माहितीचे आधारे इसम नामे मोहम्मद सरफरोज शागीर शाह, वय २४ वर्ष, रा. रयतवारी कॉलरी, आमटे लेआउट, चंद्रपूर यास ताब्यात घेवुन चोरीस गेले मालाबाबत व साक्षीदारासह विचारपुस केली असता त्याने नमुद गुन्हा व पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत आणखी दोन घरफोड्या दोन विधी संघर्षित बालकासह केल्याची कबुली पंचा समक्ष दिली. त्यानुसार सदर गुन्हयातील व इतर गुन्हयातील चोरीस गेले सोन्याचे दानिने, चांदीचे दागिने व वस्तु, गुन्हयात वापरलेली मोपेड अॅक्टिव्हा असा एकुण ३,६७,६९०/- रू माल जप्त करण्यात आला आहे. नमुद आरोपीस पुढील तपासकामी पोलीस स्टेशन घुग्गुस यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास पो. स्टे घुग्गुस करीत आहे. –
सदरची कार्यवाही सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर ,यांचे मार्गदर्शनात महेश कोंडावार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांचे नेतुत्वात दिपक कांकेडवार सहायक पोलीस निरीक्षक, पोउपनि संतोष निंभोरकर, पोहवा/१२२७ चेतन गज्जलवार, पोहवा / ८९८ जंयता चुनारकर, पोहवा / ७८८ नितेश महात्मे, पोशि/९९ अमोल सावे, पोशि/८८७ प्रफुल्ल गारघाटे, पोशि/१२३९ किशोर वाकाटे, महिला अंमलदार अपर्णा मानकर, दिपीका सोडणार, वाहनचालक दिनेश अराडे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी कारवाई केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here