आशा व गटप्रवर्तक संघटना ( सिटू ) चे पहिले तालुका अधिवेशन वणी येथे संपन्न

34

आशा व गटप्रवर्तक संघटना ( सिटू ) चे पहिले तालुका अधिवेशन वणी येथे संपन्न

कष्टाचे योग्य दाम मिळवून देणारी देशातील एकमेव व मोठी संघटना म्हणजे CITU – कॉ. ॲड. दिलीप परचाके
________________
वणी : “जनतेचा आरोग्याचा प्राथमिक दुवा असलेल्या आशा व गटप्रवर्तक यांना मात्र आपल्या कष्टाचे दाम प्राप्त करण्यासाठी शासनाशी भांडावे लागते आहे. यासाठी CITU संघटना अग्रेसर राहून संघर्ष करीत आहे. सिटू ही कामगार संघटना समाजातील सर्वच कामगारांचा प्रश्नावर लढणारी देशपातळीवरील सर्वात मोठी संघटना आहे आणि आशा व गटप्रवर्तकांना त्यांचे हक्काचे दाम मिळविण्यासाठी एकमेव संघटना आहे”, असे प्रतिपादन आशा व गटप्रवर्तक संघटना (सिटू) च्या पहिल्या वणी तालुका अधिवेशन प्रसंगी उद्घाटक म्हणून कॉ. ॲड. दिलीप परचाके यांनी केले.

ह्या पहिल्या वणी तालुक्याचा अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून माकपचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आशा व गटप्रवर्तक संघटनेचा जिल्हा सचिव कॉ. उषा मुरखे ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉ.सरिता दानव उपस्थित होत्या.

अधिवेशनाचा सुरुवातीला लाल झेंड्याला सलामी देण्यात आली. त्यानंतर शहिदांना व हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर तालुक्याचा संघटनेचा अहवाल कॉ. प्रीती करमनकर यांनी मांडला. ह्यावर चंदा मडावी, मेघा बांडे, कुंदा देहारकर, ताई डोंगरे, मीनाक्षी थेरे यांनी आपली मते मांडून अहवालाला पाठिंबा दिला. अध्यक्षपदावरून बोलताना कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी यांनी संघटनेचे महत्त्व विषद केले तर कॉ. सरिता दानव यांनी संघटना वाढी साठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.

कॉ. उषा मूरखे यांनी आशांना त्यांचा प्रश्नांवर का संघर्ष का करावे लागते हे विषद करून ९ फेब्रुवारीला होणाऱ्या जिल्हा अधिवेशनाची माहिती दिली.
या अधिवेशनात पुढील तीन वर्षासाठी १३ सदस्यीय तालुका कमिटी निवडण्यात आली. अध्यक्षपदी कॉ. मेघा बांडे, उपाध्यक्ष पदी कॉ. जयश्री सोनटक्के, सचिवपदी कॉ. सुनिता डवरे, सहसाचिवपदी कॉ. वर्षा गोवारदिपे, संघटकपदी कॉ. मीनाक्षी थेरे तर कॉ. निशा रामटेके, कॉ. पायल नालमवार, कॉ. ईशा भालेराव, कॉ. चंदा पथाडे, कॉ. शुभांगी डोंगरे, कॉ. किरण बोंसुले, कॉ. रंजना डांगे, कॉ. शीला नळे यांची एकमताने निवड करण्यात आली.

अधिवेशनाला तालुक्यातील अनेक गावातील आशा व गट प्रवर्तक यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here