गांधी चौक घुग्घूस येथे ताजुद्दीन बाबा (र. अ.) जन्मदिन उत्सव उत्साहात साजरा
घुग्घूस : विदर्भाचे सुप्रसिद्ध सुफी संत हिंदू – मुस्लिम ऐकतेचे प्रतीक नागपूर येथील बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या जन्मदिनी 27 जानेवारी 2025 रोजी सांयकाळी 07 वाजता गांधी चौक घुग्घूस येथे शुभम मांढरे, अय्युब शेख दीपक वाणी यांच्या तर्फे जन्मदिन उत्सव आयोजित करण्यात आला
शहरातील काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या हस्ते भव्य मोठा केक कापून व मसाला भात वाटप करून जन्मदिन साजरा करण्यात आला याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे नेते सैय्यद अनवर, काँग्रेस जिल्हा महासचिव अलीम शेख, इंटक जिल्हा उपाध्यक्ष शहजाद शेख,सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, व्यापारी संघटनेचे प्रकाश हजारें, किरण पुरेल्ली, रोहित डाकूर, बालकिशन कुळसंगे, दिपक पेंदोर, व मोठ्या संख्येने नागरिकगन उपस्थित होते.