शिरपुर पोलीस थाण्यात अवैध धंद्याचा वसुलीबाज कोण ? 

61

शिरपुर पोलीस थाण्यात अवैध धंद्याचा वसुलीबाज कोण ,?



अवैध धंदेमुळे क्षेञात गुंडागर्दी,चोरीचे प्रमाण वाढले


जुनी सावंगी,पुनवट,पुरड,सेलु,कोलगाव साखरा,गावात पैनगंगा,निर्गुडा नदीतुन रेती तश्करी जोमात


साखरा राहुल ढाबा येथुन अवैध डिझल तश्करी मोठ्या प्रमाणावर


सुंदर नगर येथे एकाच दिवसी पाच ठीकाणी घराफोडी


शिंदोला मार्गावर अवैध देशी दारू जोमात सुरु


  • शिरपुर : यवतमाल जिल्हातील वणी तालुक्यात गिट्टी खदानी, लाइमस्टोन खदान,सिमेट कारखाने,कोळसाखदानी असे मोठमोठ्या उद्योगामुळे शिरपुर थाना लहान असुन तरी जिल्हयाभरात थाण्याची मोठी ओळख आहे.मागील काही महीन्यापासुन क्षेञामध्ये अवैध धंद्याची मोठी पूर आली आहेत.भर दिवसात जागोजागी अवैध धंदे चांगलेच फोफावले आहेत .माज बिक्री, खर्रा विक्री, सुगंधित तंबाकू,गांजा, अवैध दारु,कोळसा तश्करी, भंगार चोरी,शेती शिवारात कोबळा बाजार,रेतीची तश्करी असे अवैध धंदे राजरोसाने सर्रासपणे शिरपुर पोलीस थान्याच्या डोळयासमोर जोमाने सुरु आहेत.हे कुणाच्या आशीर्वादाने सुरु आहे.सगऴ सर्वसामान्या जनतेला सांगण्याची गरज नाही.कारन या धंद्याची वसुली ‘सुनिल,”करीत असतो.मागील काही वर्षापासुन क्षेञात सुनिलची मोठी धाक व प्रसिद्धि मिळुन आली आहे.त्यामुळे या अवैध ध़ंद्यावाल्यावर पोलीस प्रशासनाचे वचक सध्याच्या स्थितीमध्ये राहीलेली नाही शिरपुर थाने क्षेञात वाढती गुन्हेगारी,घराफोडी,आणि इतर अवैध धंद्यामुळे छोटी-मोटी भाईगीरी ची ओळख होऊं लागली आहे.गेल्या आठवडयात एकच दिवसी पाच ठीकाणी घराफोडी झाली असुन पाच लाखाचे दागीने,नगदी रोखरकम, मोटरसाइकिल चोरी झाली असुन शिरपुर क्षेञात सध्या स्थितीत कायद्या व सुव्यवस्तीचा प्रश्न निर्मीण झाला आहे.या तालुक्यात मागील काही दिवसापासून अवैध व्यवसीकांच्या चांगलच में बसवल्याने अवैध वसुली जोमाने सुरु आहे.त्यामुळे यांच्यावर पोलीस विभागाचा हात नाही न ? अशा प्रश्न सामान्य नागरीकांना पडु लागले आहे.सर्व सामान्य लोकाचा पोलीस प्रशासनावर विश्वास उडत चाललेला आहे.हे सगळे अवैध धंधे शिरपुर पोलीस थानेदारच्या डोळयासामोर सुरु आहेत . ग्रामीण तसेच मुख्य मार्गावर ट्रान्सपोर्ट वाहतुकीची व्यवस्था दुर करणयाऐवजी येथील वाहतुक पोलीस अन्य मार्गावर कर्तव्य करीत असतांनी दिसतात यातील अनेक अवैध व्यवसीकांना स्थानीय पोलीसांचे पाठबळ मिळत असल्याची आणि राजकीय पक्षाचे वरदरामुळे पोलीस हतबळ होत असल्यांचे दिसुन येत आहे.इथे रुंजु झालेल्या नविन पोलीस निरीक्षाकाकडुन जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या परंतु त्यानाही खिळ कुठेतरी बसली या अवैध व्यवसीकांवर पोलीस अधिक्षकांनी आळा घालुन कायदा व सुव्यवस्था कायम राखतील आणि शिरपुर थान्यात अवैध वसुलीबाज ‘सुनिल ‘कोण ? यांची चौकशी करुन बदली तसेच कार्रवाई करण्यात यावी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here