राजुरा गोमणी नाल्यातुन रेती तश्करी करीत असतांना दोन ट्रैक्टर वर चंद्रपुर गुन्हेशाखाची कार्रवाई

34

 

राजुरा गोमणी नाल्यातुन रेती तश्करी करीत असतांना दोन ट्रैक्टर वर चंद्रपुर गुन्हेशाखाची कार्रवाई



राजुरा:
 दिनांक 12/02/2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोस्ट राजुर हद्दीतील मौजा गोमनी नाल्यातून अवैध्यरित्या रेती चोरून नेत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सापळा रचून रेती सह दोन ट्रॅक्टर असा एकुण- १६,१०,०००/-रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीचे नाव :-
१) अरुण श्रीधर मालेकर वय ३९ वर्ष, धंदा-मजुरी मालक
२) शैलेश नामदेव तलांडे वय २४ वर्ष, व्यवसाय ड्रायव्हर,
३) संदेश मारोती मुसळे वय २६ वर्ष, व्यवसाय ड्रायव्हर,
सर्व रा.आर्वी, ता.राजुरा, जि. चंद्रपुर
वरील आरोपींनी अवैधरित्या रेती चोरून वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरूद्ध पो. स्टे. राजुरा अप. क्र. ५६ /२०२५ कलम ३०३(२) भा.न्या.सं. सह कलम ४८ (७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम-१९६६ सहकलम – १, २, ३ गौण खनिज अधिनियम १९५२, सह कलम १३०(१)/१७७, ५० मो.वा. का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here