घरफोडी करणारी अंतराज्यीय टोळी ला रामनगर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने केली अटक

29

घरफोडी करणारी अंतराज्यीय टोळी ला रामनगर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने केली अटक



एकुण १,१६,१६४ रू चा मुद्देमाल जप्त केला जप्त


चंद्रपुर :
आकाश वासुदेव गिधवानी वय ३२ वर्ष धंदा किराणा दुकान चालवीणे रा. रामनगर सिध्दी कॉलनी दुर्गा माता मंदिर जवळ चंद्रपुर, नी दिनांक ०९/०१/२०२५ रोजी पोलीस स्टेशन रामनगर येथे येवुन तोंडी रिपोर्ट दिली की, दिनांक ०७/०१/२०२५ रोजी राञी 10 वाजता त्यांनी त्यांचे दुकान बंद करून आपल्या घरी गेले व दिनांक ०८/०१/२०२५ रोजी चे सकाळी १०:०० वा. आपले दुकान उघडण्या करीता आले असता त्यांना त्यांचे दुकानाचे सेटर ला लागलेला ताला तुटलेला दिसला दुकानाची पाहनी केली असता दुकानाचे कॅश काउन्टर मध्ये अंदाजे १५,०००/- रू व विवीध प्रकारचे सिगारेट चे पॉकीट दिसुन आले नाही तरी कोणी तरी अज्ञात चोराणी सदर दुकानाचा ताला तोंडुन दुकानात प्रवेश करून दुकानाचे काउन्टर मधिल नगदी रोख रक्कम चोरून नेले अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे रामनगर येथे अपराध

कमांक २७/२०२५ कलम ३०५, ३३१ (४) बि.एन.एस गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदर गुन्हयाचे तपासादरम्यान महिती मिळाली की बाहेरराज्य तेलंगाना येथील आरोपी नामे

१)मानकचंद बुधारामजी कुमावत, वय ३५ वर्षे, मजूर. बिरोळ ता. जैतरण, जि. पाली, राज्य राजस्थान एच.एम. इद्वेशम, गौतम स्कुलचे पाथीमागे ता. पट्टणचूर जि.

संगारेड्डी राज्य- तेलंगणा

२) भंडारम उर्फ ​​बाबू करनमजी कुमावत वय ३८ वर्षे. पटवा ता. जैतरण, जि. पाली, राज्य राजस्थान एच.एम. इद्वेशम, गौतम स्कुलचे पाथीमागे ता. पट्टणचूर जि.

संगारेड्डी राज्य- तेलंगणा

३) गणपत बगदारामजी कुमावत वय ४१ वर्ष रा. बांजाकुडी ता. जैतारण, जि. पाली, राज्य- राजस्थान ह.मु. इद्वेशाम, गौतम स्कुलचे पाठीमागे ता. पट्टणचुर जि. संगारेड्डी राज्य- तेलंगणा. यांनी सदर गुन्हा केला असुन ते सोलापूर येथे अटक असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर आरोपी हयांना सोलापूर येथुन अटक करून त्यांना चंद्रपूर येथे आणुन त्यांचेकडे गुन्हयात संबंधाने विचारपूस केली असता त्यांनी गुन्हयातील चोरीचा माल हा हैद्राबाद येथे ठेवल्याबाबत माहिती दिल्याने रामनगर गुन्हे शोध पथकाने आरोपीसह हैद्राबाद येथे जावून आरोपीचे ताब्यातुन चोरीस गेलेले १) ब्रिस्टाल २) आईस ब्रश ३) गोल्ड फ्लॅग प्रिमीयम ४) गोल्ड फ्लॅग असे विवीध कंपनीचे सिगरेट पॉकीट असा एकुण

१,१६,१६४ रू चा मुद्देमाल हस्तगत केला.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपूर, मा. अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके, तसेच गुन्हे शोध पथक रामनगर चे प्रमुख सपोनी देवाजी नरोटे, सपोनी उगले, पोहवा/०९ पेत्रस सिडाम, पोहवा / २२७३ शरद कुडे, पोहवा/१४४६ सचिन गुरनुले, पोहवा / ११६५ आनंद खरात, पोहवा / २४५४ प्रशांत शेंद्रे पोहवा / २४३० लालु यादव, मपोहवा/४६२ मनिषा मोरे पोशि / ८२५ हिरालाल गुप्ता, पोशि७८७ रविकुमार ढेंगळे, पोशि ६३० प्रफुल पुप्पलवार, पोशि/८८१ संदीप कामडी, पोशि १२३०/ पंकज ठोंबरे, पोशि २७८०/कन्हैया पवार, मपोशि २६५३ ब्युल्टी साखरे यांनी कार्यवाही केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here