अवैध धंदेमुळे क्षेञात गुंडागर्दी,चोरीचे प्रमाण वाढले….
कोंडा नाला,वर्धी नदीतुन रेती तश्करी जोमात…..
येथुन अवैध दारूची तश्करी सर्रासपणे मोठ्या प्रमाणाव..
………………………………………………….
माजरी : चंद्रपुर जिल्हातील व वरोरा उपविभागीय पुलिस अधिकारी क्षेञात वेकोलि कोळसा खदानी मोठमोठ्या ट्रान्सपोर्ट कंपनी तसेच उद्योगामुळे माजरी थाना लहान ग्रामीण भागात असुन तरी जिल्हयाभरात थाण्याची मोठी ओळख आहे.मागील काही महीन्यापासुन क्षेञामध्ये अवैध धंद्याची मोठी पूर आली आहेत.भर दिवसात जागोजागी अवैध धंदे चांगलेच फोफावले आहेत .माजा बिक्री, खर्रा विक्री, सुगंधित तंबाकू,गांजा, अवैध दारु,कोळसा तश्करी, भंगार चोरी,शेती शिवारात कोबळा बाजार, आंबेडकर चौक,चर्च जवळ, कृष्णा कालणी,सलुन शाप,फल विक्रेता, बंगाली होटल, शुक्रवार बाजार,येथे अवैध सट्टा पट्टी बाजार सुरु, रेल्वे पटरी तसेच पाटाला मुख्य चौकात अवैध दारुची सर्रासपणे दिवस राञ सुरु,कोंडा नाला,पाठला भुरखी घाट येथुन जोमात रेतीची तश्करी असे अवैध धंदे राजरोसाने सर्रासपणे माजरी पोलीस निरीक्षकाच्या डोळयासमोर जोमाने सुरु आहेत.
हे कुणाच्या आशीर्वादाने सुरु आहे.सगऴ सर्वसामान्या जनतेला सांगण्याची गरज नाही.कारन या धंद्याची वसुली ‘कोण,”करीत असतो.मागील काही वर्षापासुन क्षेञात अवैध वसुली करणारा पुलिसची मोठी धाक व प्रसिद्धि मिळुन आली आहे.त्यामुळे या अवैध ध़ंद्यावाल्यावर पोलीस प्रशासनाचे वचक सध्याच्या स्थितीमध्ये राहीलेली नाही माजरी थाने क्षेञात वाढती गुन्हेगारी, चोरी,आणि इतर अवैध धंद्यामुळे छोटी-मोटी भाईगीरी ची ओळख होऊं लागली आहे.गेल्या काही वर्ष भरात, गुंडागर्दी,घराफोडी,हत्या झाली असुन माजरी पोलीस थाना क्षेञात सध्या स्थितीत कायद्या व सुव्यवस्तीचा प्रश्न निर्मीण झाला आहे.
या तालुक्यात मागील काही दिवसापासून अवैध व्यवसीकांच्या चांगलच में बसवल्याने अवैध वसुली जोमाने सुरु आहे.त्यामुळे यांच्यावर पोलीस निरीक्षकाचा हात नाही न ? अशा वसुलीबाज पोलीस कोण? प्रश्न सामान्य नागरीकांना पडु लागले आहे.सर्व सामान्य लोकाचा पोलीस प्रशासनावर विश्वास उडत चाललेला आहे.हे सगळे अवैध धंधे माजरी पोलीस थानेदारच्या डोळयासामोर सुरु आहेत.
माजरी ग्रामीण तसेच मुख्य मार्गावर ट्रान्सपोर्ट वाहतुकीची व्यवस्था दुर करणयाऐवजी येथील वाहतुक पोलीस अन्य मार्गावर कर्तव्य करीत असतांनी दिसतात.माजरी सर्वीस मार्गावरुन ओवर बर्डनची (मातीची)मोठमोठे वाहने दिवस राञ फेरेया लावत असतानी दिसतात येथे अपघाताचा मोठा प्रश्न निर्माण होत असल्यांचे दिसुन येत आहेत.क्षेञातील अनेक अवैध व्यवसीकांना तसेच मोठ्या ट्रान्सपोर्ट कंपनीला स्थानीय पोलीसांचे पाठबळ मिळत असल्याची आणि राजकीय पक्षाचे वरदरामुळे पोलीस हतबळ होत असल्यांचे दिसुन येत आहे.
इथे रुंजु झालेल्या नविन पोलीस निरीक्षाकाकडुन जनतेला मोठ्या अपेक्षा होत्या परंतु त्यानाही खिळ कुठेतरी बसली या अवैध व्यवसीकांवर वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच पोलीस अधिक्षकांनी आळा घालुन कायदा व सुव्यवस्था कायम राखतील आणि माजरी थान्यात अवैध वसुलीबाज ‘पोलीस ‘कोण ? यांची चौकशी करुन बदली तसेच कार्रवाई करण्यात यावी.असी मांगणी सामाजिक कार्यकर्ता तसेच नागरीकाकडुन होत आहे.