घुग्घुस नगर परिषदेत “NAKSHA”या कार्यक्रमाला उपस्थितीसाठी आमंत्रित

31

घुग्घुस नगर परिषदेत “NAKSHA”या कार्यक्रमाला उपस्थितीसाठी आमंत्रित



घुग्घुस: दि,१८ फेब्रुवरी सकाळी ११ वाजता बालाजी लाॅन नगर परिषद घुग्घुस जवळ नगरपरिषद घुग्घुस कडुन आपणास आमंत्रित करण्यात येत आहे की,शहरी स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रातील नगर भूमापनासाठी NAKSHA हा पथदर्शी कार्यक्रम राबविण्यासाठी राज्यातील १० स्थानिक स्वराज्य संस्थेची निवड झालेली आहे. त्यापैकी चंद्रपुर जिल्हयातील नगरपरिषद घुग्घुस ता. जि. चंद्रपूर ची सदर प्रकल्पासाठी निवड झालेली आहे. सदर प्रकल्प भुमी अभीलेख विभागाबरोबरच केंद्र शासनाचा भुमि संसाधन विभाग, सर्व्हे ऑफ इंडीया व संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्था यांचे मदतीने सदर पथदर्शी प्रकल्प यशस्वी करावयाचा आहे. सदर प्रकल्पाचा केंद्र स्तरावरील कार्यक्रम शिवराजसिंग चौव्हाण, केंद्रीय मंत्री ग्रामीण विकास मंत्रालय भूमी संसाधन विभाग यांच्या शुभहस्ते रायसेन मध्यप्रदेश येथे आयोजित करण्यात आले आहे.
सदर हा कार्यक्रम नगरपरिषद घुग्घुस व्दारे आयोजित केलेला आहे. तरी सदर कार्यक्रमास पञकार , ज्येष्ठ नागरीक, सामाजिक कार्यकर्ता, राजकीय पक्षाचे अधिकारी ,पदाधिकारी अदी लोकाना आमंत्रित करण्यात आला आहेत. कार्यक्रमास आपली उपस्थीती प्रार्थनीय आहे. तरी आपण कार्यक्रमास उपस्थीत राहुन सदर कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे नम्र विनंती मुख्याधिकारी न.परीषद घुग्घुस वासीयानी केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here