अवैध ड्रग्स,अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या तीन इसमावर चंद्रपुर गुन्हेशाखा पोलीसची कार्रवाई
इसमांकडून चारचाकी वाहनासह ९,४०,७६०/- रू. चा एम.डी. (मेफॉड्रॉन) पावडर जप्त
चंद्रपुर : जिल्ह्यामध्ये मुमक्का सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर, रिना जनबंधु, अपर पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध ड्रग्स, मद्य विक्री करणाऱ्याविरोधात धडक मोहीम चंद्रपुर पोलीसांच्या वतीने चालु आहे. त्याच मोहीमेच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन, पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्ष्णक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन केले असून सदर पथकाच्या माध्यमातुन मोठ्याप्रमाणात अवैधरित्या ड्रग्स ची विक्री करणाऱ्यांची माहिती काढून त्यावर कारवाई सुरू आहे.
दिनांक १९/०२/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनिय माहिती मिळाली की, इसम नामे दिपक आसवानी, रा. सिंधी कॉलनी, रामनगर चौक, चंद्रपुर याचेसोबत दोन इसम असे मिळून दिपक असावानी याची पांढऱ्या रंगाची मारूती सुझुकी कंपनीची चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. ३४ बी.व्ही. ४४४७ मध्ये एम.डी. (मेफोड्रॉन) पावडर घेवून विक्रीकरीता बगलखिडकीकडून रयतवारी परिसर चंद्रपुर येथे जाणार आहे. सदर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना होवून रयतवारी परिसरातील निमवाटीका परिसरात सापळा रचुन दबा धरून बसून राहून मिळालेल्या माहितीमधील चारचाकी वाहन येताच चारचाकी वाहनाचा पाठलाग करून निमवाटीकेजवळ गाडी थांबवून गाडीतील इसमांना ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता त्याचेजवळ २३.४६ ग्रॅम एम.डी. (मेफोड्रॉन) पावडर किंमत १,४०,७६०/- रू. तसेच पांढऱ्या रंगाची मारूती सुझुकी कंपनीची चारचाकी वाहन क्रमांक एम.एच. ३४ बी.व्ही. ४४४७ किंमत ८,००,०००/- असा एकुण ९,४०,७६०/- रू. चा मुद्देमाल मिळून आल्याने सदर इसमाचे विरूद्ध कलम ८ (क), २१ (ब), एन.डी.पी.एस. प्रमाणे पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपींची नावे :- १) मालु ऊर्फ नसीब आरीफ खान, वय २८ वर्ष, रा. रझा चौक, बगलखिडकी, चंद्रपुर