चंद्रपुर: दिनांक 20/02/2025 रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एलसीबी पथकाने पोस्ट रामनगर हद्दीतील मौजा कोसारा येथुन अवैध्यरित्या रेती चोरून नेत असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सापळा रचून रेती सह एक हायवा ट्रॅक असा एकुण- 20,50,000/-रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीचे नाव :-
१) हायवा ट्रक चालक मयूर अकबर खान वय 27 वर्ष, रा. समादी वॉर्ड जी चंद्रपूर २) हावाया ट्रॅक मालक नितीन पुंडलिक नगराडे वय 50 वर्ष रा. नगीनाबाग ता.जिल्हा चंद्रपूर
वरील आरोपींनी अवैधरित्या रेती चोरून वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरूद्ध पो. स्टे. रामनगर अप. क्र. 149/२०२५ कलम ३०३(२) भा.न्या.सं.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.