घुग्घुस येथील नव्याने सुरू असलेला उडान पुलाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव देण्यात यावे.
सत्यशीव गुरुदेव सेवा मंडळाची मागणी
घुग्घुस: दिनांक २१/०२/२०२५ रोजी शुक्रवारला श्री सत्य शिव गुरुदेव सेवा अध्यक्ष मधुकर मालेकर घुग्घुस यांचे नेतृत्वात
१) अशोक भाऊ उड़के पालकमंत्री चंद्रपूर, २) खासदार प्रतिभाताई धानोरकर चंद्रपूर, ३) किशोर जोरगेवार आमदार चंद्रपूर, ४) जिल्हाधिकारी, चंद्रपुर, ५) पोलीस अधीक्षक ,चंद्रपूर, ६) बांधकाम विभाग चंद्रपूर, ७) कातरकर तहसीलदार,चंद्रपूर या सर्वांना पत्र देऊन विनंती करण्यात आली की मानवतेचे क्रांतिकारी स्वातंत्र्य सेनानी, १९६२ भारत चीन युद्धामध्ये महत्त्वपूर्ण सीमेवर जाऊन योगदान दिले व क्रांती घडवून आणली अशा त्या महान पुरुषाचे नाव नवीन उड्डाण पूलाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देण्यात यावे.
याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले निवेदन देते वेळेस मधुकर मालेकर, नारायण ठेंगणे, संजय भोंगळे, संत साईबाबा संस्थेचे अध्यक्ष गणेश शेंडे, गणेशजी वजे, व समस्त घुग्घुस वासीय गुरुदेव भक्त उपस्थित होते तरी प्रशासनाने तत्काळ आमची मागणी पूर्ण करावी अन्यथा गुरुदेव मार्गाने आम्हाला आंदोलन करावी लागणार याची आपण दक्षता घ्यावी