लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन घुग्घुस दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य साहित्य वितरण कार्यक्रम
उसगाव : लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने उसगाव ग्रामपंचायत मध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य साहित्य वाटप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात व्हीलचेअर, आराम खुर्ची, आधार काठी, शौचालय चेअर, गुडघ्यांचे पट्टे अशा विविध प्रकारच्या आरोग्य साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. मुकेश भेलावे यांच्या हस्ते झाले. ग्रामपंचायत उसगावच्या सरपंच सौ.निविदिताताई ठाकरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे श्री. दीपक एकोणकर, लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशनचे उपव्यवस्थापक श्री. दीपक साळवे, पोलीस पाटील श्री. नरेंद्र बच्चे, ग्रामपंचायत सदस्या सौ. यमुनाताई राजूरकर, सौ. सविता काळे, सौ. वर्षा बोदरे आणि श्री. बाळा चरडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री दीपक साळवे यांनी केले या कार्यक्रमात एकूण ९८ दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये व्हीलचेअर, आराम खुर्ची, आधार काठी, शौचालय चेअर आणि गुडघ्यांचे पट्टे यांचा समावेश होता. या उपक्रमाबद्दल बोलताना श्री. मुकेश भेलावे म्हणाले, “दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनात सुधारणा करणे हे आमचे सामाजिक दायित्व आहे. लॉयड्स इन्फीनाईट फाउंडेशन आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड नेहमीच अशा उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी तत्पर असतात.” सौ. निवेदिताताई ठाकरे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आणि म्हणाल्या, “या आरोग्य साहित्यामुळे गावकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल होईल. ग्रामपंचायत नेहमीच अशा सामाजिक कार्यांना प्रोत्साहन देत राहील.” कार्यक्रमाचे संचालन श्री अनुराग मत्ते यांनी केले तर आभार प्रदर्शन स्नेहा रणदिवे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री श्रीरंग पोतराजे , तेजस सोनटक्के, शीतल कौरासे यांनी अथक प्रयत्न केले. या कार्यक्रमामुळे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद या उपक्रमाची यशस्विता दर्शवत होता.