घुग्घूस बस स्थानक ते टेम्पो क्लब व राजीव रतन ते मातरदेवी रस्त्याची ग्रेडर लावून दुरुस्ती करा
काँग्रेसचे आर. के. मदानी कंपनीला आंदोलनाचा इशारा
चंद्रपुर जिल्हातील घुग्घूस : शहरातील राजीव रतन चौक येथे आर. के. मदानी कंपनीच्या वतीने उड्डाणपूलाचा निर्माण कार्य शुरु असून हे काम अंत्यन्त कासव गतीने शुरु आहे. या रस्त्याची परिस्थिती अंत्यन्त भीषण असून रस्त्यावर जागोजागी खड्डे असल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत असून याखराब रस्त्यामुळे याठिकाणी दररोज अपघात होत असल्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या अधिकाऱ्याला सहा दिवसाचा अल्टीमेटम दिला असून सहा दिवसात ग्रेडर द्वारे रस्ता दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी दिला आहे
राजीव रतन चौकातील हा चंद्रपूर पुणे महामार्ग असून याठिकाणी प्रचंड अशी वर्दळ असते घुग्घूस शहरातील वेकोलीच्या प्रमुख वसाहत याठिकाणी असल्यामुळे शालेय विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक,कर्मचारी, व्यापारी महिला भगिनी याच मार्गाचा वापर करतात याठिकाणी आपल्या निर्माण कार्यामुळे सध्या एकेरी मार्ग शुरु असल्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंढी निर्माण होत असते. हा रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे याठिकाणी दररोज नागरिकांचे अपघात होत असतात याला पूर्णपणे आपली कंपनीच जवाबदार आहेत. आपण निर्माण कार्य करीत असतांना नागरिकांच्या वाहतुकी करीता सुरक्षित रस्ता निर्माण करून दयाला पाहिजे मात्र कंपनी याप्रमुख समस्याकडे लक्षच देत नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. येत्या 06 दिवसात ग्रेडर मशिन द्वारे हा संपूर्ण रस्ता वाहतुकी योग्य बनवावा व धुळा पासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी वॉटर टँकर द्वारे सतत पाण्याचा मारा करावा व याठिकाणी 24 तास एक रुग्णवहीका ठेवावी अन्यथा आपल्या कंपनी विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेळण्यात येईल याला असा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, जिल्हा महासचिव अलीम शेख, तालुका सचिव विशाल मादर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, अभिषेक सपडी, सुनील पाटील, अंकुश सपाटे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.