राजकीय वैमण्यासातून काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्यावर गोळीबार?

45

राजकीय वैमण्यासातून काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्यावर गोळीबार?

सुदैवाने गोळीबारीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही

घुग्घूस : आपल्या सामाजिक व राजकीय कर्तृत्वाने संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले घुग्घूस काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या घरावर रात्री आठ वाजताच्या अज्ञात व्यक्ती द्वारे गोळीबार केल्याच्या घटनेने दहशत माजली आहे.
काँग्रेस अध्यक्ष हे घराबाहेर मोबाईल वर बोलता – बोलता घराच्या आत गेले असता जोरदार आवाज आला त्यांचे भाडेकरू घरातून बाल्कनीत कशाचा आवाज आला पाहायला आले असता त्याठिकाणी बंदुकीची गोळी पडल्याचे लक्षात आले रेड्डी यांनी घटनेची माहिती पोलीस स्टेशनला दिली असून पोलीस तपास करीत आहे
गोळीबारीच्या घटनेने शहरात दहशत वाढली असून जिल्ह्यात गुन्हेगारीच्या प्रकरणात मोठी वाढ झाली असून नुकतेच चंद्रपूरात एका पोलिसांची हत्या करण्यात आली आहे
हे प्रकरण ताजे असतांना एका राजकीय नेत्यावर झालेल्या गोळीबारीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here