कल्पनाताई पलिकुंडवार यांना श्री. नारीशक्ती पुरस्कार”

61

कल्पनाताई पलिकुंडवार यांना श्री. नारीशक्ती पुरस्कार”



चंद्रपुर:
मुक्ती फाऊडेशनी कार्यक्रमाची सुरूवात सकाळी गर्भ संस्कार कार्यक्रमांनी करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम वैदिक व अध्यात्मिक पद्धतीने साजरा करण्याचा पूणपने प्रयत्न केला. यावेळी समाजात ज्या महिलांनी अद्वितीय कार्य केले त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना सन्मानित केले. यात समाजातिल तळागाळातील महिलांचाही समावेश होता. कोणतेही माणुसकीच्या नात्याने केलेले कार्य छोटे नसून तेही तेवढेच महत्वाचे आहे. मग ती भाजी विकून पोट भरणारी असो की किर्तन करणारी आजीबाई या सर्वांनी मुक्ती फाऊडेशनच्या मंचावर एकत्र आणून सौ. मंजुश्री कासनगोद्ववार व प्रा. प्रज्ञा गंधेवार आणि संपूर्ण मुक्ती फाऊडेशन टिम यांनी त्यांचा सन्मान केला व त्यांच्या कार्याला पाठबळ, समर्थन केले. यावेळी आ. किशोरभाऊ जोरगेवार यांच्या हस्ते महाविदर्भाच्या संपादक कल्पनाताई पलिकुंडवार यांना श्री. नारी शक्तीचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सन्मानाचे प्रसंगी किशोरभाऊंनी कल्पनाताई वर्तमानपत्र चालवण्यात योगदान विषद केले. त्यांच्या ३० वर्षाच्या कार्याचा आढावा थोडक्यात केला.

यावेळी मंचावर अॅड. क्षमा धर्मपुरीवार यांची विशेष उपस्थिती होती. तसेच इतर मान्यवर महिलांचाही सत्कार करण्यात आला. छबुताई वैरागडे, सुवर्णाताई गुहे, संगीताताई लोखंडे मेघा मावळे, चंदाताई ईटनकर, परवीन खान पठान, चैतालीताई नवले, डॉ. भारती दुधानी, दशरथ सिंग ठाकुर, बबनराव अनमुलवार, जयकुमार सिंग, पुरोषोत्तम राऊत, प्रा. रूपाली आवारी, श्रुती ठाकुर ज्यांनी समाजात सुधारणा करून नविन विचारधारा समाजासमोर मांडली अशा महिला सिंधुताई चौधरी, निर्मला लेनगुरे, दिक्षा सुर्यवंशी, सुनंदा पधरे, सुनिता कदम, कल्पना जयपुरकर, सुरेखा बोंडे, नलिनी देशमुख, विद्या वासेकर, स्नेहा भाकरे, अपर्णा चिडे, वामिनी मेंढे, वर्षाताई चिडे, सुनिता पुर्णये, सोनाली फुलभोगे, साधना लसुते, योगिता महाडोळे, सुवर्णा पेचे, वासलवार संगिता खंगार, श्रीमती विजयालक्ष्मी कोटकर, सायली वैद्य, प्रियंका दौड, सरला गवळी, शितल काकडे, कविता कळसकर, आरती कैथवास, कल्पना नार्लावार, मायाताई उमरे, संजिवनी शंभरकर, हीना देसाई, विना धानमने, अक्षरी खोब्रागडे, बबीता पोखडे, उषाताई सास्तीकर, कलाताई तुरकर, प्रिती दडमल, अनुष्का ठाकरे, सुनिता पंधरे सौनु ताई वैद्य, निशा झुरमुरे, प्रभा मते, पुष्पा भोयर अनिता वानखेडे, सारीका वाहाडे तसेच कोरोना कार्य काळात आशा वर्करनी जमिनीवर कार्य केले त्या आशा वर्करचा सम्मानित करण्यात आले व इतर महिलांचा या प्रसंगी सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन सौ. नम्रता पित्तुलवार तर आभार नलिनी देशमुख यांनी केले या सोबतच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकता महिला भजन मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले

प्रा. प्रज्ञा गंधेवार, सचिव – मुक्ती फाऊडेशन चंद्रपूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here