कंटेनर वाहनातुन गोवंश (बैल) वाहतुक करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखा यवतमाल ने अटक केली

49

कंटेनर वाहनातुन गोवंश (बैल) वाहतुक करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखा यवतमाल ने अटक केली



एकुण ६० गोवंशासह ४५,०५,२००/-
रुपयाचा मुद्देमाल केला जप्त स्थानिक गुन्हे शाखा,यवतमाळची कारवाई


यवतमाळ  :
दिनांक १७/०३/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथक पांढरकवडा उपविभागात अवैध धंदेविरुध्द कारवाई तसेच अ उघड गुन्हे उघडकीस आणन्याचे दृष्टीने पेट्रोलींग करीता असतांना पथकास खात्रीलायक गोपणीय माहिती मिळाली की, एका कंटनेर वाहनातुन गोवंशीय बैल कत्तली करीता पांढरकवडा मार्गे हैद्राबाद येथे वाहतुक होणार आहेत. अशा विश्वसनिय खबरेवरुन पथकाने पंचासह रवाना होवुन पो.स्टे.पांढरकवडा हद्दीतील पिंपरी गावजावळ सापळा लावुन थांबले असतांना माहिती प्रमाणे एक कंटेनर संशयीतरित्या नागपुर कडुन येणाऱ्या रोडने येतांना दिसल्याने पो.स्टाफ चे मदतीने त्यास थांबवुन वाहनात असलेल्या इसमांना वाहनातील माला बाबत विचारपुस केली असता त्यांनी वाहनात ६० गोवंशीय बैल असल्याचे व ते कत्तली करीता हैद्राबाद येथे नेत असल्याचे सांगीतल्याने पंचासमक्ष वाहनाची पाहाणी करुन वाहनातील इसमांना त्यांचे नांव गांव विचारले असता त्यांनी १) संतोष भरलाल लोधा वय ५९ रा. फुलपुरा ता. सारंगपूर जि. राजगड मध्यप्रदेश २) मशीद अली रशीद अली वय २८ वर्ष, ३) शाकीर अली अमानत अली वय ५० वर्ष, दोन्ही रा. दांडीयावाडी ता. सारंगपूर जि. राजगड मध्यप्रदेश असे असल्याचे सांगीतले वरुन नमुद आरोपींचे तिन मोबाईल कि. ३००० रु, व नगदी २२०० रु, ६० नग गोवंश (बैल) कि.अं. १५,००,००० रु व एक कंटेनर वाहन असा एकुण ४५,०५,२०० रु चा मुद्देमाल जप्त करुन आरोपीतांना विरुध्द पोलीस ठाणे पांढरकवडा येथे प्राणी क्रुरता प्रतिबंधित अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही.कुमार चिंता,पोलीस अधीक्षक यवतमाळ,पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ, सतिश चवरे, पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि अजयकुमार वाढवे, पोउपनि धनराज हाके, पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, उल्हास कुरकुटे, सुधीर पांडे, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, सलमान शेख, सतिश फुके सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here