जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पटवारी संघाचे एकदिवसीय धरणे आंदोलन
चंद्रपुर: ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व मंडळ अधिकारी यांच्या आर्थिक व सेवाविषयक मागण्या निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना वारंवार मागण्या निकाली काढण्यासाठी भेटी घेऊन चर्चा केली व लिखित निवेदने दिली, परंतु अधिकारी वर्गाने मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष केले.
तसेच राजुरा येथील तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी जिवती तालुक्यातील पाटण येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) किशोर कुलकर यांचेवर गैर कायदेशीर मार्गाने विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे.
अशा या आर्थिक व सेवाविषयक मागण्या निकाली काढणे व गैर कायदेशीररीत्या लावण्यात आलेली विभागीय चौकशी रद्द करण्यात यावी याकरिता विदर्भ पटवारी संघ, चंद्रपूर च्या वतीने जिल्हाधिकारी,चंद्रपूर यांना यांना भेटून विनंती केली, परंतु या मागणी कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे विदर्भ पटवारी संघ,चंद्रपूर जिल्हा शाखा चंद्रपूर यांनी जिल्हाधिकारी,चंद्रपूर यांना दिनांक २१/०३/२०२५ रोजी आंदोलनाची नोटीस दिली होती.
या आंदोलनाचे टप्पे खालीलप्रमाणे
दिनांक २४/०३/२०२५ ते २६/०३/२०२५ पर्यंत काळ्या फिती लावून कामे करणे, हा टप्पा पार पडूनही या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे दिनांक २७/०३/२०२५ रोजी नाईलाजास्तव. जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर समोर एक दिवसीय सामुहिक रजा आंदोलन केला आहे. यानंतरही जर या आर्थिक व सेवाविषयक मागण्या निकाली निघाल्या नाहीत व किशोर कुलकर ग्राम महसूल अधिकारी पाटण तालुका जिवती यांचेवरील गैर कायदेशीर रित्या लावलेली विभागीय चौकशी रद्द करीत नाहीत तोपर्यंत दिनांक ०१/०४/२०२५ पासुन सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी बेमुदत सामुहिक रजा काम बंद आंदोलन करणार आहेत या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहणार आहे. या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व मंडळ अधिकारी यांनी सहभाग नोंदविलेला आहे