राळेगाव रेती घाटावरून निघालेली हायवे गाडी वणी पोलीस स्टेशन ने पकडली.

77

राळेगाव रेती घाटावरून निघालेली हायवे गाडी वणी पोलीस स्टेशन ने पकडली.



संघटित रेती चोरांचा राळेगाव रेती घाटावर धुमाकूळ, सिटीपीएस ला पुरवठा करणाऱ्या रेतीच्या गाड्या रेती चोरटे असे पळवतात.


चंद्रपूर :-
भद्रावती तालुक्याच्या राळेगाव येथील नदी घाटावरून जी रेती सिटीपीस कंपनीत नेण्यासाठी ज्या राजकीय पदाधिकारी नेत्यांच्या गाड्यांच्या नोंदी झाल्या ते नेते आता भुरटे चोर निघाले असून काल याचं घाटातून निघालेला हायवा ट्रक वणी पोलिसांनी पकडला असून या घाटावर जे राजकीय रेती चोर रेती चोरी करतात त्याचे धाबे दणाणले आहें.
काल दिनांक 26 मार्चला भद्रावती तालुक्याच्या राळेगाव रेती घाटातून वणी च्या खुल्या बाजारात रेती ऑर्डर नुसार हायवा ट्रक क्रमांक MH34-BG6899 जातं असतांना वणी पोलिसांनी पकडला, दरम्यान या रेतीची टीपी ड्रॉव्हर ला विचारली असता तो टीपी दाखवू शकला नाही पर्यायाने तो ट्रक पोलीस स्टेशनं वणी येथे जमा करण्यात आला आहें, याची माहिती वणी चे तहसीलदार यांच्याकडे सुद्धा देण्यात आली आहें, मात्र ही रेती भद्रावती तालुक्याची असल्याने या रेतीवर दंड आकारणी वणी चे तहसीलदार करू शकतात का हा मोठा प्रश्न आहें, त्यामुळे रेती वाहतूक करणारे व राळेगाव रेती घाटावर जे अनेक पक्षाचे राजकीय कार्यकर्ते रेती चोरीचा या धंद्यात उतरले आहें त्यांचे धाबे दणाणले असल्याची माहिती हाती आली असून ते कोण आहेत त्यांची यादी आता उजागार होणार आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here