डाॅ.आंबेडकरांची शिक्षणाविषयीची तळमळ प्रचंड प्रमाणात होती–

45

डाॅ.आंबेडकरांची शिक्षणाविषयीची तळमळ प्रचंड प्रमाणात होती–

मुख्याध्यापक अभय पारखी



‌‌‌ वणी– येथील राजर्षी शाहु महाराज हिंदी विद्या लयात आज 14 एप्रि ल 2025 रोजी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे 134 व्या जंयंती निमीत्य अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक .अभय पारखी सर होते तर मार्गदर्शक म्हणुन सौ.अनीता टोंगे मॅडम व सुनील गेडाम उपस्थीत होते.

याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन .पारखी सरांनी सांगीतले की शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे,शिक्षणामुळेच माणुस हा पुर्ण होतो,शिक्षणामुळेच खरा समाज तयार होतो.बाबासाहेबांची खरी तळमळ शिक्षणासाठीच प्रचंड प्रमाणात होती.बाबासाहेबांनी देशाला दिलेले संविधान हे आपल्यासाठी अमुल्य भेट आहे ती आपण जपली पाहिजे,सुरक्षीत ठेवली पाहिजे.

संविधान कोणीही हटवु शकत नाही परंतु त्यासाठी प्रगत जनतेने सजग राहणे गरजेचे असल्याचे प्रतीपादन त्यांनी केले.सौ.टोंगे मॅडम यांनी डाॅ.आंबेडकर लिखीत संविधान म्हणजे भारतीय नागरिकांना सर्वांगीन‌ विकासास मिळालेली महत्वपुर्ण संधी असल्याचे प्रतिपादन‌ केले..सुनिल गेडाम यांनी डाॅ.आंबेडकरांनी दिलेल्या संविधानात पुर्णतः बुद्धाचा धम्मच आहे,महाविराचा मानव कल्यानाचा संदेश आहे,

कृष्णाचा खरया धर्माची संकल्पना आहे,प्रेम,त्याग आहे.आपण सर्व सजग जनतेने समतामुलक समाजाच्या निर्मीतीसाठी योगदान दिले पाहिजे तेव्हाच खरया अर्थाने बाबासाहेबांना अभिवादन करीत असल्याचे विचार व्यक्त‌ केले.कार्यक्रमाचे संचालन श्री.प्रतिश लखमापुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.राजेंद्र देवतळे यांनी मानले.यशस्वितेसाठी श्री.जितेंद्र डगावकरसह सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारयांनी अथक प्रयत्न केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here