मेघदूत कॉलनी चिखलगाव वणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती ‌‌उत्साहात साजरी

38

मेघदूत कॉलनी चिखलगाव वणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती ‌‌उत्साहात साजरी


वणी : जवळच चिखलगाव येथील मेघदूत कॉलनीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती विविध कार्यक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मेघदूत कॉलनीतील सम्यक बुद्ध विहारामध्ये दिवसभर कार्यक्रमाचा रेलचेल होती .
सकाळी 10 वाजता धम्म ध्वजारोहण आयुष्यमान दिलीप कांबळे, भालशंकर गुरुजी निलेश सोनटक्के यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर विहारामध्ये बुद्ध मूर्तीचे पूजन तसेच भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्या अर्पणाचा कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप कांबळे प्रमुख अतिथी म्हणून विनोद बहादे तसेच लिलाबाई वासेकर यांच्या हस्ते करण्यात आले
या याप्रसंगी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आयुष्यमान भालशंकर गुरुजी सिसले सर सुचिता पाटील, निलेश सोनटक्के, विनोद बहादे व इतरांनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर बुद्ध वंदना घेण्यात आली याप्रसंगी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते समता सैनिक दलातर्फे पंचशील ध्वजाला मानवंदना देण्यात आली. दुपारी दोन वाजता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये वर्ग 1 ते 5 मध्ये 23 व वर्ग 6 ते 10 म्हणले 16 विद्यार्थ्यांनी भाग घेतला विजेत्यांना आकर्षक बक्षीस देण्यात आले अ गटातून प्रथम क्र. ओम मातंगी व द्वितीय क्रमांक कुमारी आराध्या महाकुलकर हिला मिळाले तर तसेच ब गटातून प्रथम क्रमांक अविष्कार चांदेकर व द्वितीय क्र. कुमारी हर्षिता गेडामला मिळाले रांगोळी स्पर्धेत जयश्री धोटे यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यामध्ये 15 महिला व मुलींनी सहभाग घेतला
त्यानंतर सायंकाळी सहा वाजता कॉलनीमध्ये धम्म रॅली काढण्यात आली रॅलीमध्ये महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करण्यात आला सायंकाळी भोजनदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन अरुण कोयरे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हरीश वासेकर यांनी केले.
अनिल पाटील अमर ठमके करमणकर ताई ठमके ताई डांगे ताई बारशिंगे ताई भालशंकर ताई कोयरे ताई तेलंग ताई फुसाटे ताई वाघमारे ताई प्राची पाटील इंगळे ताई कांबळे ताई सचिन वानखेडे मुकेश वानखेडे अमोल शंभरकर नीता ब्राह्मणे स्वाती दास दिलीप सोनटक्के दुर्योधन शेंडे संगदीप जांगडे चेतन गजभिये जोगदंडे साहेब भडके साहेब बहादेताई पुनम गोवणे मोटघरे ताई तथा बौद्ध उपासक व उपासिका यांनी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here