गडचांदूर शहरात नाल्यांची दुरवस्था दूषित पाण्यामुळे आरोग्य धोक्यात
नितेश केराम
गडचांदूर सध्या गडचांदूर शहरात राष्टीय महामार्गांचे काम अत्यंत संथ गतीने सुरु असून त्यामुळे शहरातील नाल्यांची अवस्था दय नीय झाली आहे शहरातील सर्व लहान मोट्या नाल्यांचे पाणी मुख्य नाली मध्ये मिसळले जाते मात्र महामार्ग प्रकल्पंiगतर्ग मुख्य नालीचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने पाणी साचून नाल्यांमध्ये कोंडी निर्माण झाली आहे
या साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून परिसरात डास व अन्य किटकांचा प्रचंड उपद्रव वाढला आहे विशेष म्हणजे या ना ल्यांन मधील सडलेले पाणी मिसळून गडचांदूर येतील हातपम आणि विहिरीचे पाणी दूषित झाले आहे परिणामी नागरिकांना उलट्या गुलाब ताप या सारख्या पाणी जन्य आजारांचा त्रास सहन करावा लागत आहे महामार्गांचे संथ काम जबाबदार शहरातील नागरिकांनी या बाबत अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशास नाकडून कोणतीही ठोस उपाय योजना करण्यात आलेली नाही महामार्ग प्रकल्पाचे काम सुरु झाल्या पासून मुख नालीचे काम प्रलंबित असून त्यामुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत नागरिकांनमध्ये संताप व्यक्त केला जात आहे नागरिकांची मागणी
शहरातील नागरिकांनी प्रशासनाकडे व महामार्ग प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तातडीने मुख्य नालीच काम पूर्ण करण्याची आणि सर्व कोंडलेल्या नाल्यांची सफाई करून नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे अन्यथा आंदोलन छेड ण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे