गाडेगाव कोळसा खाण होणार 15 एप्रिल सेक्शन 9 ची अधिसूचना जारी वेकोली करणार 8 गावातील जमीनीचे अधिग्रहण

80

गाडेगाव कोळसा खाण होणार 15 एप्रिल सेक्शन 9 ची अधिसूचना जारी

वेकोली करणार 8 गावातील जमीनीचे अधिग्रहण



नितेश कोरम
कोरपना :  वेकोलीच्या वणी क्षेत्राती ल सर्वात मोठी खुली कोळसा खाण असलेल्या पैनगंगा कोळसा खाणीचे विस्तारीकरण करण्यात येत असून कोळशाची वाढती मागणी लक्षात घेता पैनगंगा खुल्या कोळसा खाणीची दुसरी कोळसा खाण गाडेगाव खाण या नावाने सुरु होत असून यासाठी जमीन अधिग्रहण करण्याच्या सेक्शन 9 ची अधिसूचना वेकोलि कडून जाहीर केली असून या कोळसा खाणी साठी गाडेगाव सह 8 गावातील जमिनीचे कोळसा खाणीसाठी अधिग्रहण करण्यात येणार आहे
वेकोलीच्या वणी क्षेत्रातील सर्वात मोठी उत्पादन देणारी कोळसा खाण म्हणून पैनगंगा खुल्या कोळसा खाणीचे मुबलक प्रमाणात साठे आढळून आल्याने वेकोलिने काही वर्षांपूर्वी वीरूर गावाचे पूनर्वसन केले नंतर टप्या टप्याने वेकोली प्रशासनाने परिसरातील जमिनीचे अधिग्रहण केले
मात्र कोळशाची वाढती मागणी लक्षात घेता आता पैनगंगा खुल्या कोळसा खाणीचे विस्तारीकरण करण्यात आले असून पैनगंगा खुल्या कोळसा खाणीची दुसरी कोळसा खाण गाडेगाव या नवीन नावाने सुरु करण्यात येणार असून खाणी साठी लागणाऱ्या जमिनीच्या अधिग्रहण सेक्शन 9 ची अधिसूचना वेकोली प्रशासनाने 15 एप्रिल जारी केली असून या गाडेगाव खुल्या कोळसा खाणी साठी वीरूर सोनुर्ली गाडेगाव कविठगावं हिरापूर सांगोडा कारवाई गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण येणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here