कोरपना विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर काँग्रेसचा झेंडा
नितेश केराम
कोरपणा : सन 1959 साली स्थापन झालेल्या कोरपना विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समिती साठी मतदान व मतमोजणी 20 एप्रिलला पार पडली. यात 12 जागेवर काँग्रेस तर केवळ एका जागेवर शेतकरी संघटना – भाजप युतीच्या उमेदवाराचा विजय झाला.
सर्वसाधारण खातेदार गटातून रमेश मुरलीधर धारणकर विनोद लटारी कोले मारोती राघू रासेकर निखिल धनंजय गिरटकर दामाजी लक्ष्मण गोवरदीपें संदीप रामदास पारखी वामन नागोबा पिंगे बापूराव लक्ष्मण जोगी सुभाष बापूजी तुरंकर महिला राखीव गटातून सुनंदा दिलीप मालेकर संगीता चरणदास इटण कर विमुक्त जाती भटक्या जमाती विमाप्र गटातून रामचंद्र बापूजी रखारे अनु सूचित जाती जमाती गटातून रामदास खुशालराव पंधरे विजयी झाले.
यातील रमेश मुरलीधर धरणकर यांची यापूर्वीची अविरोध निवड झाली होती बापूराव लक्ष्मण जोगी व सलाम लियाकत अली यांना समसमान मते पडल्याने ईश्वर चिठी मध्ये बापूराव लक्ष्मण जोगी विजय झाले.
यात शेतकरी संघटना भाजप युतीतील सुभाष बापूराव तुरंणकर हें एकमेव उमेदवार विजयी झाले निवडूनक निर्णय अधिकारी म्हणून एम पि दोनाडकर यांनी काम पहिले.
निवडूनक निकालानंतर कोरपना शहरातून विजयी रॅली काढण्यात आली ही निवडूनक माजी आमदार व काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सुभाष धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे संचालक व काँग्रेसचे जेष्ठ नेते विजयराव बावणे यांच्या नेतृत्वात लढण्यात आली होती.
विजयी रॅलीत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष उत्तमरावं पेचे कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती अशोकराव बावणे माजी सभापती शयाम रणदिवे भारत चणे नगर उपाध्यक्ष इस्माईल शेख मनोहर चणे नितीन बावणे सुरेश मालेकार आदी सह मोट्या संखेने नागरिक उपस्थित होते.