आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने संगीता दासरवार यांचा स्वयंरोजगाराचा मार्ग मोकळा
आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते शिलाई मशीनचे वाटप
चंद्रपूर, दि. २७: दादाभाई नौरोजी वॉर्ड, बल्लारपूर येथील संगीता दासरवार यांना स्वतःचा शिलाई व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने शिलाई मशीन उपलब्ध करून देण्यात आली. आर्थिक अडचणींमुळे अपूर्ण राहिलेलं स्वप्न आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यामुळे पूर्ण झाले. याबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याप्रती संगीता दासरवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

संगीता विशाल दासरवार आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मिळेल ते काम करत होत्या. मात्र तुटपुंज्या उत्पन्नामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. स्वतःचा शिलाई मशीन व्यवसाय सुरू करण्याची तीव्र इच्छा असूनही आर्थिक अडचणीमुळे त्यांचे स्वप्न अपूर्ण होते. यासंदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयात भेट घेऊन मदत मिळण्यासंदर्भात निवेदन दिले. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तात्काळ शिलाई मशीन उपलब्ध करून दिली.