रेकॉर्ड वरील गुन्हेगाराकडुन ०९ मोटार सायकल स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी जप्त केले.

5

रेकॉर्ड वरील गुन्हेगाराकडुन ०९ मोटार सायकल स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी जप्त केले.



 चंद्रपुर : दिनांक ३०/०४/२०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील उप-विभाग, चंद्रपुर पथकातील अधिकारी व कर्मचारी असे पोलीस अधिक्षक यांचे मार्गदर्शनात तसेच पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे नेतृत्वात चंद्रपुर शहरात मोठ्या प्रमाणात मोटार सायकल चोरी होत असल्याने मोटार सायकलचा तसेच अज्ञात आरोपीतांचा शोध घेणे कामी रवाना होवुन पेट्रोलींग करीत असतांना मुखबिर कडुन माहिती प्राप्त झाली की, एक इसम त्याचे ताब्यातील विना कागदपत्राची तसेच विना नंबरची मोटार सायकल विक्री करीता बंगाली कॅम्प चौक, चंदपुर येथे ग्राहकाचे शोधात फिरत आहे. सदर खबरे वरून सापळा रचुन आरोपी नामे मिलींद जयभारत डंभारे, वय-३२ वर्ष, रा. लोणी, ता. कोरपणा, जि. चंद्रपुर यास बंगाली कॅम्प चौक, चंद्रपुर यांस ताब्यात घेवुन कौशल्यपुर्ण तपास करून त्याचे कडुन वेगवेगळया ठिकाणाहुन एकुण ०९ मोटार सायकल तसेच मोपेड गाडी जप्त करून पोलीस स्टेशन रामनगर, चंद्रपुर शहर, राजुरा तसेच हिगनघाट जि. वर्धा येथील असे एकुण ०६ गुन्हे उघडकीस आणले आहेत. नमुद आरोपीवर चंद्रपुर जिल्हयात मोटार सायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपीचे नाव मिलींद जयभारत हंभारे, वय-३२ वर्ष, रा. लोणी, ता. कोरपणा, जि. चंद्रपुर असे आहे.
आरोपी कडुन जप्त माल वेग-वेगळया कंपनीच्या मोटार सायकल तसेच मोपेड गाडी असा एकुण ४,९०,०००/- रूपयाचा मु‌द्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपुर,अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा/सुभाष गोहोकार, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा/रजनिकांत पुठ्ठवार, पोहवा/दिपक डोंगरे, पोअ/प्रशांत नागोसे, पोअ/किशोर वाकाटे, पोअ/शशांक बदामवार, पोअ/अमोल सावे, पोअ/प्रमोद कोटनाके सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here