वनसडी येथे हवा महामार्गांवर स्कायवॅiकर प्रवास असुरक्षित रस्ता ओलांडणे ठरतेय जिकिरीचे

24

वनसडी येथे हवा महामार्गांवर स्कायवॅiकर
प्रवास असुरक्षित रस्ता ओलांडणे ठरतेय जिकिरीचे



नितेश केराम
कोरपना राजुरा आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे सद्यास्थितीत काम सुरु आहे महामार्ग चौपदरी झाल्याने रस्ताच्या दोनी बाजूकडून रस्ता ओलांताना ग्रामस्थाना अडचणी निर्माण होत आहे यात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही या दृष्टीने कोरपना तालुक्यातील वनसडी येथे स्कायवाक उभारून पादाचार्याना जाण्या येण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.
राष्ट्रीय महामार्गांवरील वनसडी हें मोट्या बाजारपेठेचे गाव आहे त्यामुळे येते नेहमीच मोट्या प्रमाणात रेलचेल असते या ठिकाणी भरधाव वाहने धावत असल्याने पांदनचाऱ्यांना रस्ता ओलांडताना असुरक्षित प्रवास करावा लागतो तसेच रस्त्याच्या एका बाजूला तलाठी कार्यालय बँक ऑफ इंडिया बाजार पेठ तर दुसऱ्या बाजूला ग्रामपंचायत वन विभागाचे कार्यालय आयुर्वेदिक दवाखाना शाळा जुने गाव बाजार आदी म्हवपुर्ण बाबी आहे.
त्यामुळे दैनंदीन रस्ता ग्रामस्थांना ओलांडावा लागतो परंतु आता प्रवास मार्ग पूर्वीसारखा सुरक्षित नाही त्यामुळे वृद्ध मंडळी लहान मुलं पुरुष महिला मंडळीच्या दृष्टीने रस्त्याच्या मध्ये भागात स्कायवॅiकर उभारण्यात यावा जेणेकरून रस्ता ओलांडणे सुरक्षित रित्या होईल या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महामार्ग कंटरेक्शन कम्पनी ने ही व्यवस्था करावी अशी अपेक्षा वेक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here