आबई फाटा ते वेळाबाई रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यासाठी शिवसेना (उबाठा) ने आंदोलन पुकारला

17

आबई फाटा ते वेळाबाई रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यासाठी शिवसेना (उबाठा) ने आंदोलन पुकारला



वणी तालुक्यातील आबई फाटा ते वेळाबाई रस्त्याच्या बांधकामाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या आहेत मात्र अद्याप वर्कऑर्डर देण्यात आली नाही. मागील पाच वर्षापासून स्थानिकांना होणाऱ्या यातना, पिकांची नष्ठ झालेली उत्पादन क्षमता लक्षात न घेता संबंधित विभाग चालढकलपणा करताना दिसत आहे.
परिसरात मोहदा येथे मोठ्या प्रमाणात असलेल्या गिट्टी ,दगळ,गौण खनिजांच्या खाणी, त्यातून उत्खनन व निर्माण होत असलेल्या खनिजाचे हजारो अवजड वाहनातून इतरत्र होणारे दळणवळण, यामुळे अक्षरशः रस्त्याची चाळणी झाली आहे. स्थानिकांच्या घरावर दोन इंच धुलिकणांचा थर साचला आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतातील पिकांची पुर्णतः वाट लागली आहे. तर उत्पादन क्षमता संपुष्टात आली आहे.
आबई फाटा ते वेळाबाई या दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरुन दररोज हजारो अवजड वाहने खनिजांची वाहतूक करतात. वाहनांच्या दळणवळणामुळे प्रदूषणाने उच्चांक गाठला आहे. परिसरातील नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. वातावरणात “सिलिकाडस्ट” पसरतोय यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका वाढला आहे. तर प्रदूषणामुळे वंध्यत्व, नपुसकत्व येण्याची भीती निर्माण झाली आहे.
त्यामुळे आबई फाटा ते वेळाबाई या रस्त्याच्या तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या असून 1 में महाराष्ट्र दिन व कामगार दिन पर्यंत संबंधीत रस्त्याचे वहन क्षमते नुसार काम सुरु करावे.रस्ता बांधकाम सुरू करण्याबाबतीत 27 एप्रिल ला बांधकाम विभाग,कार्यकारि अभियंता यवतमाल, उपविभागीय अभियंता वणी, उपविभागीय पुलिस अधिकारी वणी, पोलीस स्टेशन शिरपुर मध्ये निवेदन देण्याला आला. संबंधित विभागाने टाळाटाळ केल्यास 6 मे पासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आ. संजय देरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिकांना सोबत घेऊन या मार्गावरील मालवाहतूक रस्ता बंद केला.बांधकामाला सुरवात होई पर्यंत बंद ठेवण्यात येईल.असे इशारा देऊन आंदोलनला सुरु करण्यात आला.या तीव्र आंदोलनात काही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन जबाबदार असेल सुचित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here