चंद्रपूर : शहरात मागील काही दिवसापासून वाढलेल्या मोटारसायकल चोरीस प्रतिबंध करून चोरांचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणावेत बाबत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी चंद्रपूर शहर व रामनगर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी असिफराजा शेख यांना सूचना व मार्गदर्शन केले होते.
त्यानुसार पोलीस निरीक्षक असिफराजा शेख यांना पोलीस स्टेशन रामनगरचे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मोटारसायकल चोरी करणारे चोरांबाबत गोपनीय माहिती काढून चोरीचे गुन्ह्यांची उकल करण्याबाबत आदेशीत केले होते.
त्यानुसार रामनगर पोलीस स्टेशनच्या शोध पथकातील अधिकारी व अंमलदार पो.स्टे. रामनगर येथे दाखल अपराध क्र. ६७९/२०२४ कलम ३७९ भा.द.वि. मधील चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा तसेच अन्य मोटारसायकल चोरीचे बरेच गुन्हे हे (१) विशाल नानाजी लेडांगे, वय ३९ वर्षे, रा. जगन्नाथबाबानगर, चंद्रपूर व (२) विनोद पत्रुजी शेंडे, वय ४३ वर्षे, रा. आंबेडकर कॉलेज, मित्र नगर, चंद्रपूर यांनी केले आहेत. त्यानुसार त्यांचा शोध घेत असताना वारंवार ते पोलीसांना चकवा देत होते.
त्यानुसार पोलीसांनी सतत त्याच्या मागावार राहून त्याचा ठाव ठिकाणा शोधून त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून सदर गुन्ह्यातील चोरील गेलेल्या मोटारसायकल सह मूल, जि. चंद्रपूर व नागपूर रोड, चंद्रपूर येथील मोटारसायकली चोरल्याच्या कबूली दिल्या आहेत. त्याचेकडून सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेली होंडा कंपनीची स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. ३४ ए.टी. ३८५२ हीचेसोबत अन्य ०२ अशा एकूण ०३ मोटारसायकल एकूण ९०,०००/- रूपये किंमतीच्या जप्त केल्या आहेत. त्याच्याकडून अन्य अपराध उघडकीस येण्याची शक्यता आहे.
वरील कारवाई ही पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असिफराजा शेख, सहा. पोलीस निरीक्षक देवाजी नरोटे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस अंमलदार मनिषा मोरे, आनंद खरात, जितेंद्र आकरे, लालू यादव, पेतराज सिडाम, प्रशांत शेंदरे, शरद कुडे, सचिन गुरनुले, रविकुमार ढेंगळे, संदिप कामडी, हिरा गुप्ता, पंकज ठोंबरे, प्रफुल पुप्पलवार, ब्ल्युटी साखरे यांनी केली आहे.