घुग्घुस भारतीय बौद्ध महासभा तर्फे बुध्द जयंती साजरी
घुग्घुस: बुद्ध पौर्णिमा किंवा वैशाखी पौर्णिमा हा बौद्धांसाठी सर्वात महत्वाचा मोठा दिवस आहे. सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जन्म या दिवशी झाला होता. एवढेच नाही तर, याच दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि शेवटी त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झाले. अशाप्रकारे हा दिवस बुद्धांच्या जीवनातील तीन सर्वात महत्वाच्या टप्प्यांना समर्पित आहे. हा दिवस वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुस च्या वतीने दिनांक 12 मे 2025 रोजी तथागत भगवान बुद्ध यांच्या 2588 वी जयंती दिना निमित्त पंचशील बौद्ध विहार घुग्घुस येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दरवर्षी प्रमाणे तथागत भगवान बुद्ध, चक्रवर्ती अशोक सम्राट, महात्मा ज्योतिबा फुले, प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून धम्म ध्वजारोहण करण्यात आला. नंतर उपस्थित सर्व बौद्ध बांधवानी सामुहिक त्रिशरण पंचशील घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुरेश मल्हारी पाईकराव होते तर प्रमुख उपस्थीती म्हणून, प्रकाश राऊत पोलीस निरीक्षक घुग्घुस, प्रमुख मार्गदर्शक म्हणून किशोर तेलतुंबडे जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जिल्हा चंद्रपूर, मंदाकिनीताई दुधे केंद्रीय शिक्षिका, मायाताई सांड्रावार केंद्रीय शिक्षिका, हेमंत पाझारे विहार बांधकाम कोषाध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
बुध्द जयंतीचे औचित्य साधून प्रतीभाताई कैलास भगत यांनी आपल्या मुलाचा रवी कैलास भगत याचा तिसरा दिवस न करता विहार बांधकामा करिता 10000 (दहा हजार रुपये) सुरेश मल्हारी पाईकराव, किशोर तेलतुंबडे, मंदाकिनी दुधे, माया सांड्रावार, हेमंत पाझारे, चंद्रगुप्त घागरगुंडे, अश्विनी सातपुते, वैशाली निखाडे, प्रतीभा कांबळे, रमाबाई सातारडे यांच्या उपस्थितीत दान दिले.
सायंकाळी सहा वाजता रायसिंग कराओके ग्रुप घुग्घुस कराओके ट्रॅकपर संगीतमय प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे संचालन रमाबाई सातारडे यशोधरा महिला मंडळ कोषाध्यक्षा यांनी केले तर आभार व्यक्त प्रतिभाताई कांबळे यांनी केले सरणत्य घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळेस शरद पाईकराव उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा घुग्घुस, चंद्रगुप्त घागरगुंडे कार्याध्यक्ष, वैशालीताई निखाडे कोषाध्यक्ष, अश्विनीताई सातपुते अध्यक्षा समता सैनिक दल, रिताताई देशकर अध्यक्षा यशोधरा महिला मंडळ घुग्घुस, संभाजी पाटील, दिगांबर बुरड, जनार्दन जिवने, जयंत निखाडे, रवी देशकर, बबन वाघमारे, विजय कवाडे, प्रविण कांबळे, धिरज पाटील, सुनिताताई भगत, पार्वताताई वानखेडे, मीनाताई गुडदे, भावनाताई कांबळे, यशोधराताई मस्के, सुषमाताई धोटे वनिताताई निखाडे, व समस्त घुग्घुस परिसरातील बौद्ध बांधव उपस्थित होते