राजुरा कोरपना जिवती गोंडपिपरीतील आदिवासी समाजाला पहिला वकील मिळाला
-
नितेश केराम
राजुरा कोरपना जिवती गोंडपिपरीतील आदिवासी समाजाला पहिला वकील मिळाला 58 वर्षानंतर नवा प्रवास ड्रा मधुकर कोटनाके यांची वकिली क्षेत्रात दमदार एन्ट्री
राजुरा 17 मे 2025 मुबंई येतील महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषद (bar councll of maharash and gova )BA.MA. व LLB या शै क्षणिक पात्रता दस्तऐवजांची तपासणी करून ड्रा मधुकर कोटनाके यांनी अधिकारी (Advocate)म्हणून मान्यता देण्यात आली आहे विशेष बाब म्हणजे वयाची 58 वर्ष पूर्ण करून सामाजिक भान ठेवून सेवानिवृत्तीनंतर ड्रा मधुकर कोटनाके यांची वकील म्हणून नवा प्रवास सुरु केला आहे राजुरा कोरपना जीवती आणि गोंडपिपरी या आदिवासी बहुल परिसरातील पहिलं आदिवासी वकील म्हणून ओळखले जातील सामाजिक कार्यातून न्यायाच्या सेवेकडे
सेवानिवृत्तीनंतर समाजसेवा हेच ध्येय ठेवून ड्रा मधूकर कोटनाके यांनी वकीलाचा अभ्यास पूर्ण केला स्थानिक आदिवासी समाजाच्या हक्कानंसाठी आणि न्यायासाठी लढणारा आवाज बनण्याचा त्यांनी निर्धार केला आहे त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाने परिसरातील अनेक तरुiणांना प्रेरणा मिळत आहे या यशामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी आणि समाजातील अनेकांनी आनंद वेक्त केला आहे त्यांच्या मेहनतीला न्याय मिळाल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे