खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश:

50

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश:

गडचांदूर नगराळा, येल्लापूर बस सेवा पूर्ववत सुरु
18 मे 2025


निकेत केरम
चंद्रपूर,: गडचांदूर पहाडावर जाण्यासाठी नगराळा मार्गे राजुरा, गडचांदूर, येल्लापूर ही एसटी बस गेल्या सव्वा महिन्यापासून बंद असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती विध्यार्थी शेतकरी कर्मचारी आणि जेष्ठ नागरिकांना गडचांदूर येते रस्त्यावर रात्र काढावी लागत होती या गंभीर समस्येची दखल घेत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी तातडीने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ चंद्रपूर यांच्याकडे पाठपुरावा केला
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला पत्र क्र 1794/2025 द्रारे निवेदन दिले होते या निवेदनात त्यांनी गडचांदूर नगराळा, येल्लापूर,जीवती ही महत्वपूर्ण बस सेवा तसेच गडचांदूर येथून जिवती मार्गे धावणाऱ्या सर्व बंद बस सेवा तात्काळ पुर्ववत सुरु करण्याची मागणी केली होती तसेच या बससेवेमुळे परिसरातील नागरिक आणि विध्यार्थीची मोठी गैरसोय होत असल्याचे जिवती येते झालेल्या आढावा बैठकीत नागरिकांनी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांना सांगितले होते खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मागणीची तातडीने दखलं घेत राजुरा आगार प्रमुख राकेश बोधे यांनी त्वरित कार्यवाही करत बंद असलेली गडचांदूर, नगराळा, येल्लापूर बस सेवा आजपासून पुर्ववत सुरु केली आहे यामुळे आता या मार्गांवरील शेकडो प्रवाशांना पूर्वीप्रमाणे एसटी बसचा मोठा आधार मिळाला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here