नितेश केराम
सर्व शेतकरी खातेदारांनी विनंती आहे की शासनाच्या विविध योजनेच्या लाभासाठी शासनाने फार्मर आयडी अत्यावश्यक केले आहे त्यामुळे ज्या खातेदारांनी अद्याप फार्मर आयडी बनविले नाहीत त्यांनी तातडीने ती बनवून घ्यावी असेल आवाहन जागृत ग्राहक राजा नागपूर विदर्भ प्रांताचे अध्यक्ष दीपक देशपांडे यांनी आज एका कार्यक्रमात बोलताना केले.
शेतकऱ्यांची खरी ओळख आणि त्यांना विविध शासकीय योजणांचा लाभ या फार्मर आयडी मुळे मिळणार आहे मात्र त्यासाठी एका सातबारा वा शेतकरी खात्यावर जेवढे नाव असतील तेवढ्या सगळ्यांनी वेगवेगळे नाव नोंदवून आपल्या नावाने फार्मर आयडी बनविने आवश्यक आहे त्यामुळे अजूनही ज्यांनी आपल्या नावाने फार्मर आयडी बनविली नाही किंवा एकाने बनविली मि कशाले बनवू म्हणून सोडून न देता सगळ्यांनी तातडीने कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्रात किंवा आपल्या गावातील ग्रामपंचायत मध्ये जाऊन फार्मर आयडी बनवावी जेणेकरून शासनाच्या विविध योजनेच्या लाभसाठी आपल्याला पात्र ठरता येईल.
शासकीय योजना आपल्यासाठी आहेत त्याचा लाभ घ्या मात्र त्यासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन आपले सेवा केंद्रात जाणे आवश्यक आहे असे आवाहन विदर्भातील समस्त शेतकरी बंधू भगिनींना जागृत ग्राहक राजा सामाजिक संघटना नागपूर विदर्भ प्रांताचे वतीने करण्यात आले.