भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे वणी तालुका त्रैवार्षिक अधिवेशन संपन्न.
काॅ.मोरेश्वर कुंटलवार यांची तालुका सचिवपदी निवड
वणी*– येथील भाकप कार्यालयात(प्रा.आंबटकर भवन)दि.20 मे रोजी भाकपचे त्रैवार्षिक तालुका अधिवेशन उत्साहात संपन्न झाले.अधिवेशनाचे अध्यक्षस्थानी जिल्हासचिव काॅ.अनिल घाटे होते तर मार्गदर्शक म्हणुन किसान सभेचे राज्य कौंसिलर काॅ.अनिल हेपट उपस्थित होते.अधिवेशनात माजी तालुकासचिव राकेश खामणकर यांनी मागील तिन वर्षाचा राजकीय व संघटनात्मक अहवाल सादर केला.उपस्थित प्रतिनिधींनी त्यावर चर्चा केली.याप्रसंगी तालुक्यातील सभासद संख्येच्या आधारावर पुढील तिन वर्षाकरीता 44 सदस्यीय तालुका कौंसिलची निवड करण्यात आली व त्यामधुन 9 सदस्यीय सचिवमंडळ तथा पदाधिकारी निवडण्यात आले.त्यामध्ये तालुका सचिव काॅ.मोरेश्वर कुंटलवार(येनक),सहसचिव राकेश खामणकर(नांदेपेरा),सहसचिव पांडुरंग ठावरी(नेरड),कोषाध्यक्ष दिनेश शिट्टलवार(वणी),सदस्य अनिल घाटे,अथर्व निवडिंग,शंकर केमेकार,भारत केमेकार(नांदेपेरा),सुधाकर तुराणकर,उत्तम गेडाम,प्रमोद पहुरकर(बोरगाव),संजय कडुकर(तेजापुर),सौ.छायाताई गावंडे,सौ.यास्मीन सुलतान शेख,शंकर वावरे,सुनिलजी(राजुर काॅलरी),मुसाफीर राम,हरीष(चीखलगाव),अनिल हेपट,सुरेखा हेपट,गंगाधर गेडाम,अरुण साळवे,प्रा.धनंजय आंबटकर(वणी),अनंता शेंडे(ढाकोरी),शंकर लालसरे(कोरंबी),ऋषी उलमाले(वेळाबाई),सुधाकर कोंकमवार(नेरड),मारोती हेपट(घोंसा),बंडु झाडे(सोमनाळा),आप्पाजी काकडे(सेलु),गंगाधर मेश्राम(कायर),पंढरी मोहीतकर,सांभाशीव ताजणे(निवली),रवि गोरे,वसंता कोट्टे,गणेश कोडापे(येनक),शामसुंदर मत्ते(शिंदोला),राजु जुनघरी(गोवारी पार्डी),संतोष तितरे,प्रणीत वानखेडे(तरोडा),मिलींद रामटेके,शैलेश कांबळे,संजय ईंगोले,महेश ईंगोले(बेलोरा),चंदु पोतराजे(रासा),किर्तन कुळमेथे,मंगेश नालमवार,अरुण नालमवार(मेंढोली) यांचा समावेश आहे.नविन कौंसिलने भविष्यकालीन कृती कार्यक्रम मांडला व तो प्रतिनिधींनी मंजुर केला.जसे कि वणी येथे दि.3 जुन रोजी आयोजित जिल्हा अधिवेशनात संपुर्ण तालुका कौंसिलने उपस्थित राहणे,9 जुन रोजी संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकरी,शेतमजूरांचे प्रश्नावर होणारया देशव्यापी आंदाेलनात सहभागी होणे,9 जुलै रोजी कामगार संघटनांचा देशव्यापी भारत बंद मध्ये सहभागी होणे,तालुक्यात नविन शाखांची बांधणी करणे,येणारया जि.प.पं.स.च्या संपुर्ण जागा लढविणे आदी निर्णय घेण्यात आले.अधिवेशनाचे संचालन राकेश खामणकर यांनी तर आभार प्रदर्शन मोरेश्वर कुुंटलवार यांनी मानले.अधिवेशनात तालुक्यातील विवीध शाखांमधिल पक्ष सभासद उपस्थित होते.