कोरपना तालुक्यातील दुर्गाडीत आमदार देवराव भोंगळे यांनी पकडून दिली अवैद्य दारू
नितेश केराम कोरपना तालुक्यातील दुर्गाडी येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या पाहणीदरम्यान ग्रामस्थांनी अवैद्य दारू विक्रीबाबत तक्रार केल्यानंतर राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांनी तात्काळ कारवाई केली ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार दुर्गाडी फाट्यालगत राष्ट्रीय महामार्गांवरील एका शेतात अवैद्य देशी दारू विक्री सुरु असल्याचे निदर्शनास आले या माहितीची गंभीर दाखल घेत आमदार देवराव भोंगळे यांनी थेट घटनास्थळी धाव घेतली संबंधित ठिकाणी धडक देत त्यांनी कोरपना पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांना पाचरण केले पोलिसांनी घटनास्थळी पोहचत दोन पेट्या अवैद्य देशी दारू जप्त केली ही कारवाई ग्रामस्थाच्या उपस्थितीत करण्यात आली यावेळी आमदार भोंगळे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देऊन यापूढे अवैद्य विक्री आढळल्यास त्वरित आणि कठोर कारवाई करण्यात यावी या धडक कारवाईमुळे परिसरातील अवैद्य दारू विक्रेत्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामस्थांनी आमदारांच्या या तत्परतेचे कौतुक केले असून गावात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मदत होणार असल्याचे नागरिकांचे मने आहे