खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या अथक प्रयत्नांना यश लेंडाळा तलाव पुनरूज्जीवन प्रकल्पाअखेर मंजुरी
नितेश केराम
चंद्रपूर भद्रावती शहरातील अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या लेंडाळा तलावाच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाला केंद्र शासनाच्या अमृत 2,0 योजने अंतर्गत अखेर मंजुरी मिळाली आहे या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी 17 कोटी रुपयांचा निधी नुकताच शासन निर्णयाद्रारे मंजूर झाल्याने भद्रावतीच्या विकासाला एक नवीन दिशा मिळणार आहे
विशेष मनजे या प्रकल्पाला राज्यस्तरीय तांत्रिक मान्यता समितीच्या 3 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या बैठकीतच तांत्रिक मंजुरी मिळाली होती त्यावेळी विद्यमान खासदार बाळूभाऊ धानोरकर व प्रतिभाताई धानोरकर या विद्यमान आमदार होत्या त्यामुळे या निर्णयात काही महीन्यापूर्वी झालेल्या आमदारांनी कोणताही फुकटचे श्रेय घेऊ नये असा स्पष्ट टोला खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी लावला आहे
या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळण्यामागे खासदार प्रतिभा ताई धानोकर यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि नगर परिषद भद्रावतीमार्फत वेळोवेळी शासन दरबारी सादर केलेले प्रस्ताव यांचा मोलाचा वाटा आहे आमदार असतानाच 2019-20 मध्ये त्यांनी हा विषय विधानसभेत मांडून त्याची आवश्यकता अधोरेखित केली होती लोकसभा खासदार म्हणूनही त्यांनी नगरपरिषदेचे प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा दिला आणि मंत्रालयिन पातळीवर विविध बैठकांमध्ये हा मुद्धा सातत्याने मांडत प्रकल्पाच्या मंजुरीसाठी अथक पर्यन्त केले लेंडाळा तलावाच्या पुनरुज्जीवनाचे स्वप्न भद्रावतीच्या जनतेने पहिले होते आणि आता त्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकले गेले आहे या प्रकल्पाच यश केवळ कोणत्याही एका राजकीय वेक्तीच्या श्रेयवादापुरते मर्यादित नसून ते भद्रावतीच्या जनतेच्या हितासाठी आहे त्यामुळे यामध्ये खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या योगदानाला नाकारून केवळ राजकीय प्रशिद्रीसाठी श्रेय घेण्याचे पर्यन्त अत्यंत खेदजनक आहेत