जिल्हा स्तरीय स्केटिंग स्पर्धेत साईप्रकाश अकादमीच्या २१ स्पर्धकांना विजयी पदक

23
  1. जिल्हा स्तरीय स्केटिंग स्पर्धेत साईप्रकाश अकादमीच्या २१ स्पर्धकांना विजयी पदक ji


४ गोल्ड, ५ सिल्व्हर तर १२ ब्रांझ


भद्रावती, दि. २७ : बल्लारपूर येथे झालेल्या आठव्या जिल्हा स्तरीय रोलर ॲथलेटिक्स स्केटिंग स्पर्धेत साईप्रकाश कला अकादमीच्या बालकुमार उन्हाळी शिबिरातील स्केटिंगच्या २१ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.

या स्पर्धेच उद्घाटन आमदार सुधीर मुनगुंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील २५० विद्यार्थी ( स्केटर ) सहभागी झाले होते. दरवर्षी बालकुमार फन अँड लर्न उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून स्केटिंग प्रशिक्षण दिले जाते. बालकुमार शिबिराचे २९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्या पैकी २१ विद्यार्थ्यांनी पदक तालिकेत आपलं नाव नोंदवून घवघवीत यश प्राप्त केले. यापैकी ४ गोल्ड, ५ सिल्व्हर तर १२ ब्रांझ पदक मिळवून भद्रावती चे नाव लौकिक केले.

बालकुमारचे शिबिराचे संयोजक शालिक दानव, विनोद ठमके, क्षितीज शिवरकर व स्केटिंग प्रशिक्षक राज येरणे यांचे समस्त भद्रावतीकरांकडून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here