नितेश केराम कोरपना चालू वर्षातील 2025-26 खरीप पिकांसाठी तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांनी खात बियाणे व कीटकनाशके खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी शासन मान्यता कृषी निविष्ठा विक्री परवाना असलेल्या कृषी केंद्रातूनच खरेदी करावे असे आवाहन पंचायत समिती कोरपना चे कृषी अधिकारी विवेक दुधें यांनी शेतकऱ्यांना केले आहे बोगस व बेकादेशीर बियाणे म्हणजे काय ज्या बीयाण्याच्या उत्पादनास व विक्रीस शासनाची परवानगी नसते वीद्याण्याच्या उत्पनासंबंधी मनघडन व खोटे दावे करून आमिष दाखविण्यात येते बियाण्याच्या व्यवहारांमध्ये शासनमान्य गराचे अधिकृत बिल शेतकऱ्यास दिले जात नाही बियाण्याच्या पाकिटावर बियाण्याच्या गुणत्तेचा तपशील व कोणत्याही तंत्रण्यान उल्लेख नसतो अनधिकृत बियाणे वापरामुळे जर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले तर त्या साठी नुकसान भरपाई चे हमी शासन व ग्राहक मंच सुद्धा घेऊ शकत नाही असे बियाणे बोगस व बेकादेशीर असते शेतकऱ्यांननी रासायनिक खते बियाणे व किटनाशके खरीदी करताना अधिकृत व परवानाधारक विक्रेत्या कडूनच खरीदी करावी यासाठी पक्क्या बिलाच्या आग्रह धरावा विक्रेता पक्के बिल देण्यास नकार देत असल्यास किंवा इतर कुठलीही शंका तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्या कडे सपंर्क साधून तक्रार नोंदवावी बिलावर खरेदी केलेल्या बियाण्याच्या गुणवतेचा सम्पूर्ण तपशील नोंदवीलेंला आहे कि नाही याची खात्री करावी खरीदी केलेल्या बियाण्याचे पॉकिट सी लबंद मोहरबंद तथा लेबलसह असल्याची खात्री करावी बियाण्याच्या उगवणक्षमतेचा अंतिम मुदतीचा दिनांक पाहूनच पॉकिट किंवा ब्याग खरीदी करावी एमआरपी पेक्षा जास्त किमतीने विक्री होत असल्यास त्वरित कृषी विभागाकडे तक्रार नोंदवावी रासायनिक खत खरेदी करताना ब्याग वरील एमआरपी किंमत बघूनच खरेदी करावी जर कोणताही वेक्ती अथवा संस्था बेकादेशीर पद्धतीने बोगस बियाण्याची खाताची विक्री करताना आढल्यास त्याच्याविरुद्ध बियाणे नियंत्रण आदेश 1983 रासायनिक खत नियंत्रण आदेश 1985 अंतर्गत तरतुदी प्रमाणे कारवाई केली जाईल अशी बोगस बियाणे व खते विक्री होत असल्याची बाब शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यास तात्काळ कृषी कार्यलयाशी संम्पक साधावा असे कृषी अधिकारी पंचायत समिती कोरपना यांनी शेतकरी बंधुना आवाहन केले