श्री संत शिरोमणी काशिनाथ महाराज देवस्थान, उसगांव तर्फे गंगा दशहरा महोत्सव आणि हरिनाम सप्ताहचा आयोजन 

14

श्री संत शिरोमणी काशिनाथ महाराज
देवस्थान, उसगांव तर्फे गंगा दशहरा महोत्सव आणि हरिनाम सप्ताहचा आयोजन 



घुग्घुस- येथील २७ मे २०२५ ते गुरुवार दि. ५ जुन २०२५ रोजी स्थळ: श्री संस्थान,उसगांव सर्व भाविक भक्तांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही श्री संत शिरोमणी काशिनाथ महाराज देवस्थान, उसगांव यांच्या वतीने २७ मे व ५ जून २०२५ पर्यंत एकुण दहा दिवस दशहरा सप्ताहाचे आयोजन केलेले आहे, व त्याकरीता दररोज भजन,पूजन,किर्तन,नित्य पाठ,आरती, पालखी,ग्रामस्वचछता तसेच सांस्कृतिक स्पर्धेचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत,
तरी सर्व भाविकांनी व गावकऱ्यांनी या कार्यक्रमांचा लाभ द्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी, श्री स्वामी चैतन्य महाराज रा, वढा यांच्या उपस्थितीत दररोज पूजा,आरती होईल, मंगळवार २७ मे २०२५ रोजी
सकाळी ६,००ते ७.०० वाजे ग्रामस्वच्छता, सकाळी ७:३० ते ९:३० वढा येथील वर्धा व पैनगंगा संगामावरुन भजन दिंडी व कलश यात्रेसह महाराजांच्या स्नान व अभिषेका करीत गंगा जल आणने,
सकाळी १०.०० ते १२.०० घटस्थापना व अभिषेक , दुपारी ३.००ते ६.०० श्री संत काशिनाथ महाराजांची पालखी,कलश यात्रा,( शोभा यात्रा) गावभ्रमना करीता निघेल सोबत श्री स्वामी चैतन्य महाराज, पदावली भजन मंडळ, उसगांव हनुमान पदावली भजन मंडळ, उसगांव, हनुमान पदावली भजन मंडळ,वढा, नवयुवक बजरंगबली पदावली भजन मंडळ,मुर्सा रेणूका महिला भजन मंडळ,घुग्घुस व महिला भजन मंडळ शेनगांव राहतील, सायं ७:३० ते ८.००- नित्यपाठ व पूजाआरती
रात्रो ८:३० ते ९.००- पदावली भजन मंडळ, उसगांव ( आरती)
रात्रो ९.००ते १२.०० वारकरी सांप्रदायिक भजन मंडळ, घुग्घुस, श्री, डोमाजी वानखेडे व विलास पाटील आवारी यांचा संच, दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण मोठ्या संख्येंने भाविक भक्तांनी उपस्थितीती दर्शविली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here