यवतमाल पांढरकवडा हद्दीतील मोहदा येथुन  हिंदुस्थानि धाब्यावर जेवणा करीता थांबलेल्या ट्रॅव्हल्स मधुन चांदीच्या दागिन्यांची बॅग चोरीत सापडले

9

यवतमाल पांढरकवडा हद्दीतील मोहदा येथुन  हिंदुस्थानि धाब्यावर जेवणा करीता थांबलेल्या ट्रॅव्हल्स मधुन चांदीच्या दागिन्यांची बॅग चोरीत सापडले



सदर गुन्हयात बाहेर राज्यातील टोळी निष्पंन्न करुन ७,६८,७८८/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.


मोहदा:
दिनांक २२/०५/२०२५ रोजी रात्री ०९/२० वा दरम्यान फिर्यादी प्रतिक प्रदिप कोटक (सराफा व्यापारी) हे त्यांचे मामा जिगनेश जयंतीलाल हिंडोच्या रा. यवतमाळ यांचेकडुन ८,००,१२३/- रुपये किमतीचे १६ किलो ८२७ ग्राम चांदीचे दागिने खरेदी करुन सर्व दागिने एका काळया बॅगमध्ये घेऊन यवतमाळ येथुन किसरा दमईगुडा तेलंगणा येथे जाण्याकरीता विजय ट्रॅव्हल्स क्रमांक एन षएल ०१ बी २९०१ क्रमांकाच्या बसने निघाले असता सदर ट्रॅव्हल्स ही रात्री ११/०० वा सुमारास मोहदा येथील हिंदुस्थानि धाबा येथे जेवण करणेकरीता थांबली असता फिर्यादी प्रतिक कोटक हा त्याची चांदीच्या दागिण्यांची बॅग त्यांचे सिटवर ठेवुन वॉशरुमला जाऊन परत आला असता त्यांची बॅग कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे त्यांचे लक्षात आल्यावर फिर्यादी हा घाबरुन अगोदर तेलंगणा येथे घरी गेला व दिनांक २४/०५/२०२५ रोजी परत येऊन पो.स्टे. पांढरकवडा येथे चांदीच्या दागिण्यांची बँग चोरी गेल्याची लेखी फिर्याद दिली, त्यावरुन अज्ञात आरोपी विरुध्द अप.क्र. ४३४/२०२५ कलम ३०३ (२) भान्यासं अन्वये गुन्हा नोंद करुन तपासात घेण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेऊन मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांनी गुन्हा तात्काळ उघडकीस आणनेकरीता गुन्हयाचा समांतर तपास करणेबाबत स्था.गु. शाखेला सुचना दिल्या होत्या. त्यावरुन गुन्हयातील अज्ञात आरोपीतांचा शोध घेणेकरीता स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ येथील अधिकारी व अंमलदार यांचे तपास पथकाने घटनास्थळाला भेट देऊन सी.सी.टी.व्ही फुटेज पडताळून पाहिले असता तिन अज्ञात ईसम हे एक काळया रंगाची बॅग घेऊन बनावट नंबर प्लेट लावलेल्या पांढ-या रंगाचे क्रेटा कार मधुन पळुन जातांना दिसुन आले. स्था.गु.शा. पथकाने गोपनिय बातमीदार सुध्दा सतर्क केले होते. त्यातुनच स्था.गु.शा. पथक यवतमाळ यांनी तांत्रीक बाबी व गोपनिय बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, गुन्हयातील आरोपी हे पटेलपुरा लुन्हेरा (बुजुर्ग) ता. मनावर जिल्हा धार राज्य मध्यप्रदेश येथील असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने स्था.गु.शा. येथील तपास पथक तात्काळ पटेलपुरा मनावर जि धार मध्यप्रदेश येथे रवाना होऊन आरोपी क्र १) मोला खान रोशन खान, वय ३८ वर्ष, रा. पटेलपुरा लुन्हेरा (बुजुर्ग) ता. मनावर जिल्हा धार राज्य मध्यप्रदेश याला ताब्यात घेऊन त्याचेकडे कौषल्यपुर्वक चौकशी केली असता त्यांने सदर चोरी त्याचे सहकारी आरोपी क्र. २) मुस्ताख ऊर्फ चिलु शमशेर खान व आरोपी क्र.३) शारुख खान रमजान खान दोन्ही रा. खेरवा जि धार राज्य मध्यप्रदेश यांचेसह केल्याचे त्याने कबुल करुन आरोपी क्र १) मोला खान याचे
जवळुन १६ किलो १६८ ग्राम ७,६८,७८८/- रु किंमतीचे चांदीचे दागिने जप्त केलेत. आरोपी क्र १ मोला खान रोशन खान याला व जप्त मुद्देमाल पोलीस स्टेशन पांढरकवडा यांचे ताब्यात देण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. नितीन सुशीर पोलीस स्टेशन पांढरकवडा हे करत आहेत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ श्री. कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुश जगताप, यांचे मार्गदर्शनात श्री. सतिश चवरे, पोलीस निरीक्षक स्थागुशा यवतमाळ, सपोनि अजयकुमार वाढवे, पोउपनि धनराज हाके पोलीस अंमलदार १) सुनिल खंडागडे, २) सुधीर पांडे, ३) उल्हास कुरकुटे, ४) सुधीर पिदुरकर, ५) निलेश निमकर, ६) रजनिकांत मडावी, ७) सलमान शेख, ८) सतिश फुके, ९) नरेश राऊत. सर्व नेमणुक स्थागुशा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here