वेकोलि क्षेत्रीय प्रबंधकमध्ये निवेदन देऊन जमीनीची मांगणी केली
वेकोलीची 10 हजार चौरस फूट जागा गार्डन व प्ले ग्राउंड करीता उपलब्ध करून देण्याबाबत..
चंद्रपूर : शहरातील इंदिरा नगर बॉम्बे प्लॉट परिसरात वेकोलीची सुमार 10,000 चौरस फूट जागा गेल्या 10 वर्षांपासून पडीत अवस्थेत आहे. ही जागा सध्या पूर्णपणे दुर्लक्षित असून, त्याचा गैरवापर वाढू लागला आहे. या ठिकाणी असामाजिक प्रवृत्तींचा वावर वाढला असून, जुगार खेळणे, मद्यपान करणे आणि इतर गैरकृत्ये सुरु आहेत. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना याचा त्रास होत आहे.
या परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या असुरक्षित वातावरणामुळे भविष्यात नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. या परिसरातील नागरिक, विशेषतः महिला, मुलं आणि वृद्ध व्यक्ती या असामाजिक प्रवृत्तीमुळे अस्वस्थ झाले आहेत.
सदर जागेचा योग्य वापर करून ती जागा गार्डन आणि खेळाच्या मैदानासाठी उपलब्ध केल्यास परिसरातील नागरिकांना व्यायाम, खेळ, चालणे, सामाजिक संवाद तसेच सुसंस्कृत उपक्रमांसाठी एक चांगली जागा उपलब्ध होईल. यामुळे परिसराच्या विकासासह नागरिकांच्या दृष्टीनेही सुरक्षित आणि सकारात्मक वातावरण निर्माण होईल.
त्यामुळे आपणास नम्र विनंती आहे की, इंदिरा नगर बॉम्बे प्लॉट येथील पडीत असलेली ही वेकोलीची जागा गार्डन आणि प्ले ग्राउंडसाठी स्थानिक नागरिकांच्या उपयोगासाठी उपलब्ध करून द्यावी. याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यास आपण कृपया तातडीने निर्देश द्यावेत. वेकोलि प्रशासनाला निवेदन देऊन सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा केली आहे.