श्री संत शिरोमणी काशिनाथ महाराज देवस्थानात भक्तांची गर्दी उसळली
गंगा दशहरा महोत्सव तथा हरिनाम सप्ताह
घुग्घुस- दि. ४ जून २०२५ रोजी ला सकाळी ६ ते ७.०० ग्रामस्वच्छता, सकाळी ६:३० – श्री संत काशिनाथ महाराजांची पालखी मंदिरातुन भजन दिडींसह गंगा स्नान करीता वर्धा नदीवर जाऊन, भाविक भक्तांची गर्दी उसळली, पदावली भजन मंडळ, उसगांव,वढा येथील गंगा स्नान झाल्यानंतर श्री स्वामी चैतन्य महाराज यांचे काल्याचे तसेच किर्तन करण्यात आले.
पालखी पूजन,महाराजांचे दर्शन व भाकर काला होतील नंतर पालखी वापसी मंदिरात,सायं, ६:००ते ७:०० नित्यपाठ व पूजा आरती अर्चेना सायं. ७.०० ते ८.०० वाजे दिपोत्सवचे आयोजन करण्यात आले होते.
रात्रो ८.०० ते ८:३० पदावली भजन मंडळ, उसगांव (आरती ) रात्रो ९:०० ते १२.०० सप्तखंजेरी वादक – इंजि, भाऊसाहेब थुठे महाराज लोक प्रबोधनकार रा. वर्धा यांचे जाहिर किर्तन व रात्रो १२.०० च्या नंतर – जागृती भजन – मासीरकर गुरुजी डोमाजी वानखेडे, विलास पाटील आवारी व इतर अन्य उपस्थित मान्यवरा यांचे वारकरी सांप्रदायिक भजन होते.
गुरुवार ०५ जून २०२५ रोजी सकाळी ६ ते ७.०० वाजे ग्रामस्वच्छता सकाळी ७:३० ते ८.०० नित्यपाठ व पूजा आरती, सकाळी ९:०० ते १२.०० ह. भ. प. दत्ताजी मसे महाराज रा.कडोली ( खुर्द ) त. कोरपना यांचै काल्याचै किर्तन यांना साथ संगत वारकरी सांप्रदायिक भजन मंडळ,- मासीलकर गुरुजी, विलास पाटील आवारी व उपस्थित मान्यवर होते.
दुपारी १.०० ते ३.०० – अतिथींचे स्वागत सत्कार व बक्षीस वितरण,दुपारी ३.०० पासून – महाप्रसाद सुरुवात, रात्रौ९:३० वा, डायका कार्यक्रम श्री. महादेव नारायण इंगोले.श्री कृष्णा संजय पचारे, श्री प्रफुल्ल संजय पचारे,रा, पुनवट यांच्या संच दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही भाविक भक्तांनी मोठ्या संख्येंने उपस्थिति दर्शविली होती.