.शिरपुर : दिनांक 6/06/2025 रोजी पोलीस स्टेशन शिरपुर येथे माधव शिंदे ठाणेदार शिरपुर हे आपले अधिनस्त पो.स्टॉप सह परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनिय माहीती मिळाली की, चारगांव ते पुनवट रोडने अवैध्यरित्या रेती वाहतुक होत आहे अशा प्राप्त माहीती नुसार त्वरीत ठाणेदार यानी स्टॉपसह शेलु (बु) येथे नाकाबंदी करुन चारगांव ते पुनवट रोडने येणा-या संशययित तपकिरी रंगाच्या अशोक लेलँन्ड कंपनीचा दोन्ही ट्रकांना थांबवुन सदर दोन्ही ट्रकची तपासणी सदर ट्रकमध्ये लाल रंगाची रेती दिसली. सदर रेती बाबत रॉयल्टीची विचारणा केली असता कुठल्याही प्रकारचे (रॉयल्टी) कागदपत्रे व समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने सदर दोन्ही ट्रकमध्ये अवैद्यरित्या लाल रेती वाहतुक करीत आहेत अशी खात्री झाल्याने त्यांना ताब्यात घेउन नमुद वाहनातील इसमांना त्यांचे नाव व गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 1) सैय्यद शहाबुद्दीन सैय्यद अफसर वय 33 वर्षे धंदा ड्रायव्हर रा. पुसद (खादी वॉर्ड) ता. पुसद जि. यवतमाळ 2) शेख हसन इमाम शेख उवेदुर रझाक वय 51 वर्षे धंदा – ड्रायव्हर ता. पुसद जि. यवतमाळ असे सांगितले व सदर अवैध्य रेती ही ट्रक मालक 3) उमर फारुख वय अं.45 वर्षे रा. पुसद ता.पुसद जि. यवतमाळ यांचे सांगणेवरुन वाहतुक करीत असल्याचे सांगितल्याने वरुन वरील इसमांविरुध्द दोन्ही ट्रक क्रमांक MH 29, BE-6296 व MH 29, BE-6296 कि. अं. 50,00,000 व त्यामध्ये एकुण 24 ब्रास रेती 1,92,000/-रु ची लाल रेती असा एकुण 51,92,000/-रु चा मुद्देमाल सहीत ताब्यात घेउन पुढील कारवाई कामी पोस्टे ला आणुन दोन्ही ट्रक वाहन इसमांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला तसेच अवैध्यरित्या रेतो बाबत अहवाल मा. तहसिल कार्यालय वणी येथे पाठविण्यात येत आहे.
सदरची कारवाई कुमार चिंता साहेब. पोलीस अधीक्षक, यवतमाळ. पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ,गणेश किंन्द्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी, पोलीस निरीक्षक सतीश चवरे सा. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पो स्टे शिरपुर येथील सपोनि माधव शिंदे ठाणेदार शिरपुर, पोउपनि/रावसाहेब बुधवंत, पोहवा/394 प्रशांत झोड, पोकॉ/609 पंकज कुळमेथे यांनी पार पाडली आहे.