अट्टल गुन्हेगाराकडुन जबरी चोरी व मोटर सायकलचा गुन्हा उघडकिस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरला यश

14

अट्टल गुन्हेगाराकडुन जबरी चोरी व मोटर सायकलचा गुन्हा उघडकिस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरला यश



चंद्रपुर : जिल्हयामध्ये होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्याकरिता पोलीस अधिक्षक,चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक अमोल काचोरे यांनी विशेष पथक तयार करून त्यांना त्याबाबत निर्देश दिले होते. पोलिस निरीक्षक अमोल काचोरे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सुनिल गौरकार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर सह पोलीस पथक चंद्रपुर शहरात मोसा चोरीचे रेकॉर्डवरिल गुन्हेगार शोध मोहीम पेट्रोलिग राबवीत असतांना मुखबीरद्वारे गोपनिय माहिती मिळाली कि, रेकॉर्डवरील आरोपी नामे जनरलसिंग उर्फ मन्नुसिंग टाक वय 45 वर्षे रा. समतानगर, नेरी चौक, उर्जानगर चंद्रपुर हा एस.टी वर्कशॉप तुकुम चंद्रपुर येथे चोरीचे वाहन विकण्यास येणार असल्याचे माहिती वरून एस.टी. वर्कशॉप जवळ सापळा रचला असतांना सदर ईसम हा एस.टी. वर्कशॉप चौक दुर्गापुर रोड, तुकुम चंद्रपुर येथे विना क.ची मोटर सायकल घेउन गिराईक शोधत असताना दिसला. त्यास पंचासमक्ष शिताफिने पकडुन सखोल विचारपुस केली असता त्याने एक महिण्यापुर्वी स्पलेंडर प्रो मोटरसायकल नायडु हॉस्पीटल, तुकुम चंद्रपुर येथुन चोरी केल्याचे कबुल केले. वरून आरोपीकडन मोटरसायकल हस्तगत करून पोस्टे दुर्गापुर अप.क. 112/2025 कलम 303 (2) बिएनएस चा गुन्हा नमुद उघडकीस करण्यात आला.मोटर सायकल किंमत दुर्गापूर
११२/२५ ३०३(२) बीएनएस
एक काल्या पंढरी रंगाची स्प्लेंडर प्रो मोटरसायकल MH 34 AX 3848 चेसिस क्रमांक MBHA10FFHJ79490 आणि इंजिन क्रमांक HA10ERFHJ93768
₹५०,०००/-एकुण किंमत ₹५०,०००/-
तसेच आरोपी नामे जनरलसिंग उर्फ मन्नुसिंग टाक वय 45 वर्षे रा. समतानगर, नेरी चौक, उर्जानगर चंद्रपुर यास विश्वासात घेउन सखोल विचारपुस केली असता त्याने गडचिरोली येथे महिलेकडुन सोन्याची चैन हिसकावुन जबरी चोरी केल्याचे कबुल केले. सदर गुन्हयाचे माहिती घेतली असता पोस्टे गडचिरोली येथे अप क.311/2025 कलम 304 बिएनएस अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समजले. सदर घटनेची माहिती स्थनिक गुन्हे शाखा,गडचिरोली यांना देण्यात आली आहे.
सदरची यशस्वी कामगीरी मुम्मका सुदर्शन पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्रीमती रिना जनबंधु अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो.नि. अमोल काचोरे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांचे नेतृत्वात पोउपनि विनोद भुरले, पोउपनि सुनिल गौरकार, पो.हवा. सुभाष गौहकार, नितीन साळवे, नितीन कुरेकार, सतिश अवथरे, दिपक डोंगरे, गोपाल आतकुलवार पोकॉ किशोर वाकाटे, शशांक बदामवार, प्रसाद धुळगंडे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here