राजुरा येथील रमाबाई नगर येथे महिलेचा खून अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल
नितेश केराम राजुरा शहरातील रमाबाई नगर येतील राहिवाशी महिला कविता रायपुरे वय 55 या एकट्या घरी असतांना त्यांचा खून झाल्याची घटना आज दि 15 जून रोजी सकाळी साडे सात वाजताच्या दरम्यान उघडकिस आली घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविले या प्रकणी आज्ञात आरोपीविरुद्ध राजुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रमाबाई नगर येतील हनुमान मंदिराजवळील राहिवाशी श्रीमती कविता रायपूरे यांचा मुलगा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो तो रात्री 8 वाजता आपल्या कामावर गेला होता त्यामुळे ही महिला घरात एकटीच होती दि 15 जून ला सकाळी शेजारी राहणारी महिलेची विवाहित मुलगी ममता अलोणे हिने दार ठोकले तेव्हा त्यांचे घरातून कुणाचाही आवाज आला नाही.
खिडकीतून बघितल्यावर या महिला कॉटवर झोपून असल्याचे दिसलें मात्र काहीही प्रतिसाद देत नसल्याने काही वेळानंतर दार उघडताच महिलेचा मृत्यूदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली या महिलेच्या डोके छाती व चेहऱ्यावर तीक्षण हत्याराणे वार केल्याचे दिसून आले .
या परिवाराचे कुणाचे वैमनस्य होते की अन्य काही देवाणघेवाणीच्या कारणामुळे ही हत्या झाली याचा तपास राजुरा पोलीस करीत आहे .
घटनेचा तपास ठाणेदार सुमित परतीके यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा भुते अधिक तपास करीत आहे.
कविता रायपूरे यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे एक मुलगी राजुरा येते रमाबाई नगर येतेच राहत असून दुसरी मुलगी पूजा फुसे ही यवतमाळ येते राहते राजुरा पोलिसांनी आज्ञात आरोपीवर कलम 332 (ब ) 103 (1) हत्येचा गुन्हा दाखल केला आहे